Advertisement

‘मेट्रो ३’चे चार डबे मुंबईत दाखल


‘मेट्रो ३’चे चार डबे मुंबईत दाखल
(Twitter/@AshwiniBhide)
SHARES

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेसाठीच्या पहिल्या मेट्रो गाडीचे चार डबे अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथून दोन आठवड्यापूर्वी ट्रेलर्समधून हे डबे मुंबईसाठी रवाना झाले होते. मंगळवारी पहाटे डबे मुंबईतील मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये दाखल झाले आहेत.

श्रीसिटीत मेट्रो ३ साठीच्या गाड्यांची बांधणी करण्यात येत आहे. आठ डब्यांची एक मेट्रो गाडी असणार आहे. त्यानुसार पहिली गाडी तयार झाली होती. मात्र तात्पुरत्या कारशेडच्या कामाअभावी ही गाडी मुंबईत आणता येत नव्हती.

पण आता मात्र गाडीचे चार डबे आले असून उर्वरित चार डबे लवकरच मुंबईत येतील अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दिली. त्यानंतर मेट्रो ३ ची तीन किमी लांबीची चाचणी घेतली जाईल असेही स्पष्ट केले आहे.हेही वाचा

विरार ते मीरा रोड मार्गावर मेट्रोची गरज, राजेंद्र गावितांची लोकसभेत मागणी

मुंबईतील सर्वांत उंच मेट्रो पूल घेतोय आकार, वाहतूककोंडीपासून होणार सुटका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा