Advertisement

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मिळणार ‘हे’ नाव

घाटकोपर ते मानखुर्द दरम्यान बाधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला कुणाचं नाव द्यायचं यावरून गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला वाद अखेर शमला आहे.

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मिळणार ‘हे’ नाव
SHARES

घाटकोपर ते मानखुर्द दरम्यान बाधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला कुणाचं नाव द्यायचं यावरून गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला वाद अखेर शमला आहे. या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असं नाव देण्याचा निर्णय स्थापत्य समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.

एम पूर्व विभागातील वीर जिजामाता भोसले मार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलाला ‘सुलतानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोईनद्दीन चिश्ती’ यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. तर या पुलाचं नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असं करण्याची सूचना भाजपने केली होती. यामुळे गेल्या महिन्याभरापासून दोन्ही पक्षांमध्ये उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद सुरू होता. त्यातच पुलाचं बांधकाम पूर्ण नसल्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यातील स्थापत्य समितीच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला होता.  

हेही वाचा- २ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यावर विचार सुरू- छगन भुजबळ

त्यापार्श्वभूमीवर स्थापत्य समिती अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर, सदस्य आणि महापालिका अधिकार्‍यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं असल्याने शिवसेनेने देखील या नावावर सहमती दर्शवली. त्यानंतर शिवसेना नगरसेविका निधी शिंदे यांनी मांडलेली उपसूचना स्थापत्य समितीमध्ये गुरुवारी बहुमताने मंजूर करण्यात आली. त्यानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असं या पुलाचं नामकरण करण्यात येणार आहे.

उड्डाणपुलामुळे २५ मिनिटांची बचत

घाटकोपर - मानखुर्दला जोडणारा हा उड्डाणपूल शिवाजी नगर ते मोहिते पाटील जंक्शनपर्यंत २.९० कि. मी अंतराचा बनवण्यात आलेला आहे. या उड्डाणपुलामुळे शिवाजीनगर जंक्शन, बैगनवाडी जंक्शन, देवनार डंपिंग ग्राऊंड, फायर ब्रिगेड व मोहिते पाटील येथील वाहतूककोंडीतून मुक्तता होईल. मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच २४.२ मीटर सेगमेंट कास्टिंग तयार करून या पुलाचं बांधकाम केलं आहे. या पुलामुळे नवी मुंबई, पनवेल आणि पुणे इथं जाणार्‍या प्रवाशांच्या वेळेत २५ मिनिटांची बचत होणार आहे.

हेही वाचा- आता काँक्रीटच्या रस्त्यांवरही पडताहेत खड्डे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा