Advertisement

३ वर्षांच्या विलंबानंतर अखेर घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूल वाहतुकिसाठी खुला

२.९ किमी लांबीचा घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूल रविवारपासून वाहतुकिसाठी खुला करण्यात आला आहे.

३ वर्षांच्या विलंबानंतर अखेर घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूल वाहतुकिसाठी खुला
SHARES

२.९ किमी लांबीचा घाटकोपर-मानखुर्द (Ghatkopar-Mankhurd ) उड्डाणपूल (flyover) रविवारपासून वाहतुकिसाठी खुला करण्यात आला आहे. जवळपास ३ वर्षांच्या विलंबानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. उड्डाणपुलामुळे नवी मुंबई (Navi Mumbai) ते मुंबई (Mumbai) दरम्यान प्रवास करणाऱ्यांची घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे घाटकोपर ते मानखुर्द प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे. वाहनचालक-प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्यानं प्रवास सुखकर होऊ शकतो.

सायन-पनवेल मार्गाला आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा घाटकोपर-मानखुर्द रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर कायम प्रचंड वाहतूक कोंडी असते. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्यानं वाहनचालक-प्रवासी हैराण होते. या पार्श्वभूमीवर पालिकेनं या रस्त्यावर २.९९१ किमी लांबीचा आणि २४.२ मीटररुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला.

५८० कोटी रुपये खर्च करत सहा मार्गिकेच्या (उत्तर-दक्षिण) उड्डाणपुलाच्या कामाला २०१६ ला सुरुवात केली. हे काम २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी ते रखडले होते. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदारानं त्याचं बांधकाम पूर्ण करण्यास विलंब लावल्यानं ४० लाखांचा दंड आकारला आहे.

पालिकेनं (BMC) देवनार डम्पिंग ग्राउंडला कनेक्टर जोडून फ्लायओव्हरच्या डिझाईनमध्ये बदल केले. त्यामुळे देखील फ्लायओव्हरची बांधकाम किंमत ७०० कोटींपेक्षा जास्त झाली. उड्डाणपुलामुळे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरून नवी मुंबई त्यानंतर लोणावळा आणि पुढे पुण्याच्या दिशेनं जाता येईल.

शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी, मोहिते पाटील नगर हे पाच महत्वाचे जंक्शन तसंच देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी.एम.जी.पी. नाला या तीन मोठय़ा नाल्यांवरून हा पूल पुढे जातो. उड्डाणपूल सायन-पनवेल महामार्गाला जोडणार आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून येणारी सर्व वाहनं उड्डाणपुलाचा वापर करू शकतात.

अधिकाधिक कोकण आणि बेंगळुरूच्या दिशेनं जाणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गांशी कनेक्टिव्हिटी लक्षात घेता अवजड वाहनांच्या वाहतुकिलाही आराम मिळण्याची अपेक्षा आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या नावावरून वाद निर्माण झाला होता. शिवसेना खासदार (खासदार) राहुल शेवाळे यांनी पालिकेकडे सुफी संत ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिस्तीवर उड्डाणपुलाचं नाव ठेवावं अशी मागणी केली होती.

भारतीय जनता पक्षानं (भाजप) त्याला विरोध केला होता आणि उड्डाणपूलाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ठेवण्याची मागणी केली होती. यानंतर, २९ जुलै रोजी कार्य समितीच्या बैठकीत शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. तथापि, या नावाला पालिकेच्या महासभेनं अद्याप मंजुरी देणं बाकी आहे जे येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे.



हेही वाचा

ऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन होणार

रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च, माहिती अधिकारातून उघड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा