Advertisement

'मुंबई लाइव्ह'चा दणका: जाहिरातीविना घर देणं म्हाडा अधिकाऱ्यांना भोवलं!

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या मास्टरलिस्टमधील शिवाजी पार्क येथील एका घराचे वितरण मंडळाने जाहिरातीविना केल्याचा पर्दाफाश महिन्याभरापूर्वी 'मुंबई लाइव्ह'ने केला होता. 'मुंबई लाइव्ह'च्या या वृत्तानंतर म्हाडात चांगलीच खळबळ उडाली आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश म्हाडा उपाध्यक्षांनी दिले होते.

'मुंबई लाइव्ह'चा दणका: जाहिरातीविना घर देणं म्हाडा अधिकाऱ्यांना भोवलं!
SHARES

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या मास्टरलिस्टमधील शिवाजी पार्क येथील एका घराचे वितरण मंडळाने जाहिरातीविना केल्याचा पर्दाफाश महिन्याभरापूर्वी 'मुंबई लाइव्ह'ने केला होता. 'मुंबई लाइव्ह'च्या या वृत्तानंतर म्हाडात चांगलीच खळबळ उडाली आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश म्हाडा उपाध्यक्षांनी दिले होते.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच दुरूस्ती मंडळातील अधिकाऱ्यांना हे प्रकरण चांगलेच भोवत असल्याचे चित्र आहे. ज्या विभागाकडून हे वितरण झाले, त्या विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी अचानक तडकाफडकी बदली झाली आहे. प्रतिनियुक्तीवर आलेल्या दुरूस्ती मंडळाचे सहमुख्य अधिकारी तेजुसिंग पवार यांनी म्हाडातून पळ काढला आहे. तर दुरूस्ती मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पुनर्वसन गाळे) घोडे यांची थेट अमरावतीला उचलबांगडी करण्यात आली आहे.


काय होतं प्रकरण?

मास्टरलिस्टमधील घरांचे वितरण हे जाहिरात काढूनच करणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना नोव्हेंबरमध्ये दुरूस्ती मंडळाने जाहिरात न काढताच शिवाजी पार्क येथील प्राईम लोेकेशनवरीन एक कोटी किंमत असलेल्या घराचे वितरण केले आहे. हे वितरण बेकायदा असल्याचे म्हणत ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनने यावर आक्षेप घेत यासंबंधी म्हाडा उपाध्यक्षांकडे तक्रारही केली आहे. दरम्यान, हे प्रकरण दुरूस्ती मंडळाच्या अंगाशी आल्याची चर्चा म्हाडात असतानाच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीने चर्चेला उधाण आले आहे.


प्रतिनियुक्तीवर आले आणि ठाण मांडून बसले!

पवार प्रतिनियुक्तीवर एका वर्षासाठी दुरूस्ती मंडळात आले होते. मात्र एक वर्ष होऊन गेले, तरी ते कार्यरत होते. असे असताना आणखी दोन वर्षे कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी पवार यांच्याकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असे असताना अचानक पवार यांनी स्वत:हून बदली मागून घेतल्याचे समजते आहे. तर घोडे यांना निवृत्तीसाठी काही काळच उरला असताना त्यांची अचानक अमरावतीला बदली करण्यात आली आहे. घोडे यांचे नाव मास्टरलिस्टमधील अनेक प्रकरणांमध्ये होतेच. तर शिवाजी पार्क घर वितरणाची प्रक्रियाही त्यांच्याकडूनच रावबली गेली होती. त्यामुळेच त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे.

सहमुख्य अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली करण्यात आली असून दुसऱ्या अधिकाऱ्याचीही म्हाडाच्या धोरणानुसारच बदली झाली आहे. या बदल्या नियमानुसारच झाल्याने उलटसुलट चर्चा चुकीच्या आहेत.

सुमंत भांगे, मुख्य अधिकारी, दुरूस्ती मंडळ, म्हाडा



हेही वाचा

'मुंबई लाइव्ह' इम्पॅक्ट: हो, शिवाजी पार्कच्या 'त्या’घराचं वितरण जाहिरातीविनाच! म्हाडाची कबुली


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा