म्हाडावासीयांना मिळणार 450 चौ. फुटांचे घर

 Pali Hill
म्हाडावासीयांना मिळणार 450 चौ. फुटांचे घर

मुंबई – म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाच्या धोरणाची अधिसूचना गुरूवारी जाहीर झाल्याने म्हाडावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहेच, पण या आनंदात आणखी भर पडली आहे ती म्हाडावासीयांना मिळणाऱ्या मोठ्या घरामुळे. नव्या अधिसूचनेनुसार म्हाडावासीयांना यापूर्वी जिथे किमान 300 चौ. फुटाचे घर मिळणार होते तिथे आता त्यांना किमान 450 चौ. फुटाचे घर मिळणार आहे. त्यामुळे म्हाडावासीय खुश आहेत.

सप्टेंबर 2010 पासून म्हाडाने प्रिमियमची अट रद्द करत केवळ हाऊसिंग स्टॉक (घर) घेत म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला परवागनी देण्याचा निर्णय घेतला. मात्र बिल्डरांना हाऊसिंग स्टॉक देणे परवडणारे नसल्याने बिल्डरांनी म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाकडे पाठ फिरवली. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून एकाही वसाहतीचा पुनर्विकास झालेला नाही. पुनर्विकास रखडल्याने शेवटी म्हाडावासीयांनीच रस्त्यावर उतरत जनआंदोलन केले आणि त्यांच्या या आंदोलनाला गुरूवारी यश मिळाले.

नव्या अधिसुचनेनुसार सध्या 180 ते 225 चौ फुटाच्या छोट्या घरात राहणाऱ्या म्हाडावासीयांना 35 चौ. मीटरचे अर्थात 370 चौ. फुटाचे घर देण्याची तरतुद करण्यात आली आहे. त्यावर किमान 25 ते 35 टक्के वापरण्याजोगा फंजिबल एफएसआय मिळणार आहे. हा फंजिबल एफएसआय मिळून म्हाडावासीयांना किमान 450 चौ. फुटाचे घर मिळणार असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य आनंद गुप्ता यांनी दिली आहे. तर बिल्डर यामध्ये आणखी सोयीनुसार वाढ करून मोठे घर देऊ शकणार असल्याने म्हाडावासीयांना जॅकपॉट लागल्याची चर्चा आहे.

Loading Comments