बंगळुरूसह मुंबई आणि दिल्लीत ऑफिसच्या भाड्यांमध्ये वाढ

नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस हे हाँगकाँग, टोकियो आणि सिंगापूर यांच्यानंतर एशिया पॅसिफिकमधील चौथ्या क्रमांकाचं सर्वांत महागडं ऑफिसचं स्थान ठरलं आहे.

SHARE

एशिया पॅसिफिक प्राइम ऑफिस रेंटल इंडेक्सचं क्यू १ चं अनावरण नाइट फ्रँक या स्वतंत्र जागतिक मालमत्ता सल्लागार संस्थेनं केलं आहे. या इंडेक्समधून आशियातील महत्त्वाच्या देशांमधील ऑफिसचे भाडेदर तपासले जाते. या इंडेक्सनुसार, अलीकडे भारतातील बंगळुरू, मुंबई आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीआर) या ठिकाणी आॅफिसच्या भाडेदरात वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील आॅफिसच्या भाडेदरात २०१८ मध्ये ५ टक्के तर बंगळुरूमध्ये १७ टक्के वाढ झाली आहे. तर दिल्लीमधील आॅफिसच्या भाड्यात झालेली वाढ ही १.४ टक्के आहे. 


महागडं ऑफिसचं स्थान

नाइट फ्रँकच्या अहवालानुसार २० आशियाई शहरांपैकी १५ शहरांनी स्थिर किंवा वाढलेलं भाडेदर नोंदवला आहे. नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस हे हाँगकाँग, टोकियो आणि सिंगापूर यांच्यानंतर एशिया पॅसिफिकमधील चौथ्या क्रमांकाचं सर्वांत महागडं ऑफिसचं स्थान ठरलं आहेकॅनॉट प्लेसमध्ये आॅफिससाठी प्रती चौरस मीटर ८२.५ अमेरिकन डाॅलर इतकं मासिक भाडं आकारलं जातं. मुंबईतील बीकेसी येथे प्रती चौरस मीटर ७५.१ अमेरिकन डाॅलर एवढं मासिक भाडं आहे. बीकेसी हे सातव्या क्रमांकाचं सर्वात महागडं ऑफिसचं स्थान ठरलं आहे.


.४ टक्‍के वाढ

वार्षिक वाढीच्या संदर्भात बंगळुरू आणि मुंबईतील ऑफिस भाडेवाढ ही अनुक्रमे १७ टक्‍के आणि ६ टक्‍के राहिली आहे. बंगळुरूमध्ये मासिक भाडं प्रति चौ. फूट ३१.२ डॉलर आहे.  कॅनॉट प्लेसमध्ये आॅफिस भाड्यात त्रैमासिक १.४ टक्‍के वाढ झाली आहे.


प्रती चौ.फूट मासिक भाडं 

शहर उपबाजारपेठपहिली तिमाही २०१८चौथी तिमाही २०१८पहिली तिमाही २०१९टक्के बदल (त्रैमासिक)टक्के बदल (वार्षिक)
बंगळूरुसीबीडी १०७ रुपये१२५ रु.१२५ रु.०%१.७%
मुंबईबीकेसी२८६ रु.३०० रु.३०० रु.०%५%
नवी दिल्लीकॅनॉट प्लेस३२६ रु.३२६ रु.३३० रु.१.४%१.४%


व्यवहारांचा वेग कमी

ऑफिस जागेच्या मागणीत २०१८ मध्ये विक्रमी वाढ झाली असून सुमारे ४७ दशलक्ष चौ. फूट (एमएसएफ) जागा भाड्यानं देण्यात आल्या. तसंच, नवीन कार्यालयासाठी जागांचा पुरवठा या काळात १३ टक्‍क्यानं वाढला. प्राइम ऑफिस बाजारपेठांमध्ये जागेची कमतरता निर्माण होत आहे. मागणी वाढल्यामुळं भाडे वाढत चालले आहेत', असं नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी म्हटलं.हेही वाचा -

रेल्वे खातं मागणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग, सावंत झाले नाराज

मनसे स्वबळावर लढवणार विधानसभा?संबंधित विषय
ताज्या बातम्या