बीकेसी - 'करलो दुनिया मुठ्ठी में' म्हणत रिलायन्सने आख्ख्या देशात आपलं जाळं पसरलंय. मात्र आता 'कर लो पार्किंग मुठ्ठी में' असं म्हणायची वेळ या वाहनचालकांवर आलीय. या फोर व्हीलर, टू व्हीलरची हक्काची पार्किंग जागा हिरावली गेलीय. त्यामुळे या वाहनचालकांना नजीकच्या महागड्या रिलायन्स जीओच्या गार्डनमध्ये पार्किंगचा आधार घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, रिलायन्स जिओचं पार्किंग चालावं म्हणून तर हा घाट घातला गेला नाही ना? असा सवाल बीकेसी पार्किंग इश्यू ग्रुपने एमएमआरडीएला विचारला आहे. 'मुंबई लाइव्ह'चे वाचक सागर आणि शंतनू नाईक यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती.