Advertisement

कफ परेडमध्ये होणार देशातला सर्वात मोठा एसआरए टाॅवर

मुंबई (mumbai) तील कफ परेड (Cuff Parade) मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना (Slum rehabilitation plan - एसआरए) अंतर्गत आता सर्वात मोठा टाॅवर (tower) होणार आहे.

कफ परेडमध्ये होणार देशातला सर्वात मोठा एसआरए टाॅवर
SHARES

मुंबई (mumbai) तील कफ परेड (Cuff Parade) मध्ये  झोपडपट्टी पुनर्वसन योजना (Slum rehabilitation plan - एसआरए) अंतर्गत आता सर्वात मोठा टाॅवर (tower) होणार आहे. हा टाॅवर ४२ मजली असेल. आतापर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत जास्तीतजास्त २२ मजली इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे एसआरए (SRA)मधील देशातील हा सर्वात मोठा टाॅवर असणार आहे. शहरातला सगळ्यात महागडा परिसर म्हणून कफ परेडची ओळख आहे.

शापूरजी पालोनजी कंपनीला पुनर्विकासाची जबाबदारी द्यायचा एसआरएचा सर्वोच्च तक्रार निवारण समितीने निर्णय कायम ठेवला. कफ परेड (Cuff Parade) भागात बाबासाहेब आंबेडकर नगर, गणेश मूर्ती नगर आणि धोबीघाटमधील २८ एकर जमिनीवरच्या ६ हजारांहून अधिक झोपड्यांचं वेगेवेगळ्या टप्प्यात पुनर्वसन केलं जाणार आहे. या प्रकल्पात या भागातल्या ६० हजार जणांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रत्येक झोपडपट्टी धारकाला ३०० स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेला एक बीएचके (bhk) फ्लॅट (flat) मिळणार आहे. या घराची किंमत जवळपास २ कोटी रुपये असेल. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना एसआरए (SRA) अंतर्गत घरं (home) देऊन उरलेल्या जमिनीवर १०० मजली रहिवासी टॉवर बांधला जाणार आहे. 

या एसआरए (SRA)  प्रकल्पात  ४२ मजल्यांचे ७ टॉवर (tower) असणार आहेत.  एसआरएला या योजनेमुळे ९०० कोटी रुपये प्रिमियमच्या रुपात मिळतील.  तर महसूल विभागाला जवळपास ३,२०० कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीचे मिळतील. याशिवाय मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) मालमत्ता कराच्या रुपात वर्षाला १०० कोटी रुपये मिळतील. या प्रकल्पात स्मार्ट सिटीची सगळी वैशिष्ट्यं असतील. इमारतींना सीसीटीव्ही, सुरक्षा, वायफाय, कचरा व्यवस्थापन, उर्जा व्यवस्थापन यांच्यासारख्या अनेक सुविधा असणार आहेत. तसंच ४ हजार गाड्या पार्क करण्याची सोयही असेल.


हेही वाचा -

म्हाडा करणार कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला ५ वर्षे तुरूंगवास
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा