Advertisement

मेट्रोच्या 'या' मार्गिकेवर सव्वा किमीचा पादचारी पूल


मेट्रोच्या 'या' मार्गिकेवर सव्वा किमीचा पादचारी पूल
SHARES

मेट्रो मार्गिकेजवळील खासगी संकुलास मेट्रो स्थानकातून थेट जोडणी धोरणाअंतर्गत मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गिकेवर तब्बल सव्वा किमी लांबीचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. तर दुसरा पादचारी पूल अर्धा किमीचा असणार आहे. मेट्रो स्थानकातून मार्गिकेजवळील खासगी संकुलांना थेट जोडणीच्या धोरणास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जुलैच्या बैठकीत मंजुरी दिली.

या २ संकुलांतील प्रवाशांना रस्त्यावरील वाहतुकीत न अडकता थेट मेट्रो स्थानकापर्यंत जाता येणार आहे. त्यापूर्वी या वर्षी जानेवारीत हे धोरण तयार करण्यात आले होते. या संदर्भात एमएमआरडीएकडे मेट्रो ७ मार्गिकेसाठी चार प्रस्ताव आले होते. त्यापैकी दोन प्रस्तावांस नुकतीच मंजुरी मिळाली. आरे मेट्रो स्थानकाजवळ ओबेरॉय मॉलपर्यंत आणि पोयसर मेट्रो स्थानकापासून सरोवा प्रॉपर्टीजपर्यंत २ पादचारी पूल बांधले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आरे स्थानक ते ओबेरॉय मॉल हा पादचारी पूल १३०० मीटरचा असून, तर पोयसर स्थानक ते सरोवा ५१४ मीटर असणार आहे. यासंदर्भातील आरखड्यास एमएमआरडीएची मंजुरी मिळाली की त्यांचे बांधकाम सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या दोन्ही पुलांचा बांधकाम खर्च हा खासगी संकुलांना करावा लागेल, मात्र बांधकामानंतर मालकी हक्क एमएमआरडीएकडे राहणार असल्याची माहिती मिळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा