Advertisement

म्हाडा लाॅटरी: गेल्या ८ वर्षांतील सर्वात कमी प्रतिसाद


म्हाडा लाॅटरी: गेल्या ८ वर्षांतील सर्वात कमी प्रतिसाद
SHARES

म्हाडाच्या मुंबईतील ८१२ घरांच्या सोडतीसाठीची आॅनलाईन नोंदणी, अर्जविक्री, स्वीकृतीची प्रक्रिया गुरूवारी संपली. अपेक्षेप्रमाणे यंदा म्हाडाच्या लाॅटरीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला. अनामत रकमेसह सादर झालेल्या अर्जाच्या आकड्यांनी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जेमतेम ५९ हजारांपर्यतचा पल्ला गाठला. आॅनलाईन पेमेन्टसह अर्ज सादरकरण्यासाठी केवळ मोजकेच तास उरले असून हा आकडा जेमतेम ६१ हजारांच्या घरात जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. हा म्हाडाच्या लाॅटरीतील गेल्या ८ वर्षांतील सर्वात कमी प्रतिसाद ठरला आहे.


अशी झाली नोंदणी

८१२ घरांसाठी ६६ हजार ७८० इच्छुकांनी शेवटच्या दिवसांपर्यंत नोंदणी केली. तर अर्ज भरण्याची मुदत २४ आॅक्टोबरला संपल्याने शेवटच्या दिवसापर्यंत ७८ हजार ६७४ अर्ज भरण्यात आले. नोंदणीसह अर्ज भरण्याचा आकडाही गेल्या ८ वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.


विक्रमी आकडा ते अल्प प्रतिसाद

म्हाडा २००७ पासून मुंबईतील घरांसाठी सलग लाॅटरी काढत असली, तरी २००९ पासून म्हाडाच्या घरांवर सर्वसामान्यांच्या उड्या पडू लागल्या. त्यामागचे कारण होते स्वस्त घरे २००९ मध्ये ३९६३ घरांसाठी ६ लाखांहून अधिक अर्ज विकण्यात आले होते. तर अनामत रकमेसह ४ लाख ३० हजार अर्ज सादर झाले होते. म्हाडाच्या इतिहासातील लाॅटरीला मिळालेला हा विक्रमी प्रतिसाद होता. 

मात्र, त्यानंतर हळूहळू लाॅटरीचा प्रतिसाद कमी होऊ लागला. याचे मुख्य कारण अत्यल्प आणि अल्प या मुख्य ग्राहकांसाठीच्या घराचा आकडा कमी होऊ लागला आहे. म्हाडाची घरेही खासगी विकासकाप्रमाणे महाग होऊ लागल्याने यंदा कोट्यवधीच्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली.  


एका घरामागे ७३ अर्ज

म्हाडाच्या एका घरामागे जिथे १५० ते २०० अर्ज सादर होत होते तिथे यंदा एका घरामागे ७३ अर्ज सादर झाल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षी ९७२ घरांसाठी अंदाजे १ लाख ३६ अर्ज सादर झाले होते. म्हणजेच गेल्या वर्षी एका घरामागे १४० अर्ज सादर झाले होते. तिथे यंदा हा आकडा ७३ च्या घरातच अडकला आहे.


मागील ८ वर्षांची आकडेवारी

वर्ष
घरांची संख्या
 अर्जांचा आकडा
२००९
३८६३
४ लाख ३० हजार
२०१०
३४४९
३ लाख २८ हजार
२०११
४०३४
१ लाख ४० हजार
२०१२
२५८३
१ लाख ३८ हजार
२०१३
१२४४
८७ हजार ६४७
२०१४
२६४१
९३ हजार १०३
२०१५
१०६३
१ लाख २५ हजार
२०१६
९१०
१ लाख ३५ हजार
२०१७८१२५९ हजार २९० (संध्याकाळी सात वाजेपर्यंत)



हेही वाचा -

म्हाडाच्या लाॅटरीची प्रतिक्षा संपली, आता 10 नोव्हेंबरला लॉटरी

स्वप्नांच्या पलिकडले! लोअर परळच्या घराची किंमत २ कोटींवर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा