Advertisement

न्यायालयाची पायरी चढाल, तर 'रेरा'चे दरवाजे बंद? का ते वाचा


न्यायालयाची पायरी चढाल, तर 'रेरा'चे दरवाजे बंद? का ते वाचा
SHARES

बिल्डरांकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना दाद मागण्यासाठी 'महारेरा'चा पर्याय उपलब्ध झाल्यापासून अनेकांना न्याय मिळालेला आहे. त्यामुळे 'महारेरा'कडे दाद मागणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. पण ग्राहकांनो तुम्ही बिल्डरविरोधात 'महारेरात' दाद मागण्याआधी न्यायालायत गेला असाल, तर तुमच्यासाठी 'महारेरा'चे दरवाजे बंद होऊ शकतात. हे आम्ही नाही म्हणतं तर खुद्द 'महारेरा'ने दिलेल्या निकालावरूनच हे स्पष्ट होत आहे. रेराने नुकत्याच एका सुनावणीदरम्यान यासंबंधीचा आदेश दिला आहे.


काय आहे प्रकरण?

पुण्यातील एका ग्राहकाने कुमार बिल्डरच्या हवेली येथील कुमार शांतीनिकेतन प्रकल्पात घर खरेदी केलं. पण या घराचा ताबा बिल्डरने वेळेत दिला नाही. त्यामुळे या ग्राहकाने बिल्डरच्या फसवणुकीविरोधात दाद मागण्यासाठी दिवाणी न्यायालयात धाव घेतली.

त्यानुसार दिवाणी न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने निर्णय देत बिल्डरला दणका दिला. जोपर्यंत घराचा ताबा दिला जात नाही, तोपर्यंत बिल्डरने दरमहा १० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून तक्रारदारा (ग्राहक)ला देण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशाने समाधान न झालेल्या ग्राहकाने काही दिवसांपूर्वी थेट 'महारेरा'त धाव घेत तक्रार नोंदवली.


महारेरा काय म्हणाले?

या तक्रारीवर नुकतीच सुनावणी झाली असून 'महारेरा'चे सदस्य बी. डी. कापडणीस यांनी या ग्राहकाला 'महारेरा'मध्ये दाद मागता येत नसल्याचे म्हणत गुरूवारी यासंबंधीची तक्रार निकाली काढली आहे. 'महारेरा'च्या आदेशानुसार तक्रारकर्त्याला दिवाणी न्यायालयात न्याय मिळालेला असताना, पुन्हा न्यायालयाशी समांतर असणाऱ्या 'महारेरा' प्राधिकरणाकडे तक्रारकर्त्याला येण्याची गरजच नाही. 

'महारेरा'च्या आदेशाकडे पाहता ज्या ग्राहकांनी आधी न्यायालयात दाद मागितली असेल त्यांनी 'महारेरा'कडे नंतरहून दाद मागितल्यास न्याय मिळण्याची शक्यता नाही, असंच म्हणावं लागेल.


तक्रारकर्त्याला दंड

न्यायालयाने तक्रारीचं निवारण केलेलं असताना वरच्या न्यायालयात जाण्याएेवजी 'महारेरा'त दाद मागणं या ग्राहकाला चांगलंच महागात पडलं आहे. ग्राहकाने बिल्डरला त्रास दिल्याचं म्हणत ग्राहकाने बिल्डरला १० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेशही 'महारेरा'ने याप्रकरणी दिले आहेत.



हेही वाचा-

बिल्डरांनो सावधान ! 'महारेरा' नोंदणी क्रमांकाशिवाय गृहप्रकल्पाची जाहिरात कराल तर फसाल

म्हाडा लाॅटरी: गेल्या ८ वर्षांतील सर्वात कमी प्रतिसाद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा