Advertisement

वांद्र्यातील शासकीय वसाहतीचा कायापालट करणार- अशोक चव्हाण

पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

वांद्र्यातील शासकीय वसाहतीचा कायापालट करणार- अशोक चव्हाण
SHARES

पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. यासंदर्भात सुरूवातीचा टप्पा म्हणून सद्यःस्थितीत या वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तातडीच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी  दिले. वांद्रे शासकीय वसाहतीच्या संदर्भातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने  मंत्रालयात झालेल्या बैठकीत अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. (maharashtra government positive to redevelop bandra government colony says pwd minister ashok chavan)

या वसाहतीत नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, तोवर सध्याच्या इमारती सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश अशोक चव्हाण यांनी दिले. दुरूस्ती-देखभालीच्या या कामासाठी लागणारा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेबाबत ५ आमदारांच्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ठेवण्यात येईल, असंही अशोक चव्हाण यांनी या बैठकीत सांगितलं.

या बैठकीत रहिवाशांच्या प्रतिनिधींनी येथील समस्यांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही एक सादरीकरण करून तेथील परिस्थिती मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी राज्य सरकार वांद्रे वसाहतीतील नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं.

या बैठकीला आमदार  झिशान सिद्दिकी, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार बाबा सिद्दिकी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकाम) अजित सगणे   यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि वसाहतीतील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


हेही वाचा -

ओशिवरा पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव, पालिका १८ महिने पूल करणार बंद

धारावी पुनर्विकास प्रकल्प आणखी रखडणार, जुन्या निविदा होणार रद्द


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा