Advertisement

ओशिवरा पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव, पालिका १८ महिने पूल करणार बंद

पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी १८.५० कोटी रुपये खर्च येणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

ओशिवरा पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव, पालिका १८ महिने पूल करणार बंद
SHARES

दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला ओशिवरा पुल २०१९ मध्ये खुला करण्यात आला. मात्र पुन्हा एकदा हा पुल बंद करण्यात येणार आहे. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी १८.५० कोटी रुपये खर्च येणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

उत्तर आणि दक्षिण मुंबईला ओशिवरा पुल जोडतो. त्यामुळे हा पुल एक प्रमुख मार्ग आहे. जवळपास ४० वर्ष या पुलाला झाली आहेत. गेल्या वर्षी काम बंद करण्यासाठी हा पुल बंद केला होता. मार्च २०१९ मध्ये सीएसएमटीजवळील हिमालयन पूल कोसळल्यानंतर महापालिकेनं शहरातील अनेक पुलांचे ऑडिट केले. ज्यामध्ये या पुलाची स्थिती चांगली नसल्याचं समोर आलं होतं.

हेही वाचा : गुड न्यूज! मुंबईबाहेरील पुनर्विकासाला चालना, MMR साठी वेगळं ‘एसआरए’

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये ओशिवरा पुलाच्या पुनर्बांधणीस प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यावेळी, प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थानांवर पोहोचण्यासाठी बेहरामबाग रोड, एसव्ही रोड किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वापरावा लागेल.

"नोटीसनुसार, निविदा प्रक्रिया १० ऑक्टोबर २०२० पर्यंत पूर्ण केली जाईल. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे काम सुरू करण्याचे आदेश दिले जातील," असं प्रशासकिय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुलाच्या डागडुजीचा खर्च १८.५० कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. तरी कर किंवा अधिभार यामुळे या खर्चात आणखी वाढ होऊ शकते असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यंदा हा पूल बंद होणार नसला तरी पुढील वर्षी हे काम कधी अंमलात येईल, याबाबत अधिकाऱ्यांनी अचूक माहिती दिली नाही. सर्व शक्यतांमध्ये, २०२२ च्या अखेरीस पुनर्बांधणी होण्याची शक्यता आहे. परंतु या प्रक्रियेत आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

'मुंबई आय’चं ठिकाण बदलण्याची शक्यता

ठाणे ते दिवा सहाव्या मार्गिकेचं काम पुढच्या पावसाळ्यापर्यंत लांबणार?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा