Advertisement

'मुंबई आय’चं ठिकाण बदलण्याची शक्यता

लंडन आयच्या धर्तीवर वांद्रे इथं 'मुंबई आय' योजना राबवण्याचं प्रस्तावित आहे.

'मुंबई आय’चं ठिकाण बदलण्याची शक्यता
Photo: London Eye
SHARES

लंडन आयच्या धर्तीवर वांद्रे इथं 'मुंबई आय' योजना राबवण्याचं प्रस्तावित आहे. मात्र, आता या योजनेचं ठिकाण बदल्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व येथे प्रस्तावित असलेल्या 'मुंबई आय’ प्रकल्पामुळे येथील वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडेल. तसंच १ एकर जमीन या योजनेसाठी पुरेशी नाही. त्यामुळं योजनेचं ठिकाण बदल्याची शक्यता आहे.

अनेक निविदाकर्त्यांनी मुंबई आयकरीता जागा पुरेशी नसल्याची तक्रार केल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) इतर ठिकाणांच्या शोधात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं यापूर्वी मुंबई पर्यटन स्थळावर अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी १३ वर्षीय जुन्या योजनेची पुनर्बांधणी केली होती.

मुंबई आय उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. ८०० फूट उंचीवरून पर्यटकांना मुंबईचं दर्शन घडावं यासाठी लंडन आयच्या धर्तीवर वांद्रेत एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई आय प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यत आला होता. १३ वर्षापूर्वी ही योजना राबवण्यात येणार होती. मात्र, आतापर्यंत ही योजना बारगळली आहे. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आता पुन्ही ही योजना राबवण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. 



हेही वाचा -

ई-पास मोडीत निघणार? राज्य सरकारकडून घोषणेची शक्यता…

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा