Advertisement

ठाणे ते दिवा सहाव्या मार्गिकेचं काम पुढच्या पावसाळ्यापर्यंत लांबणार?

मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यासाठी मध्य रेल्वेवर 'एमआरव्हीसी'मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येत आहे.

ठाणे ते दिवा सहाव्या मार्गिकेचं काम पुढच्या पावसाळ्यापर्यंत लांबणार?
SHARES

ठाणे ते दिवा पाचवी व सहावी मार्गिका ही मध्य रेल्वेच्या दृष्टीनं महत्वाची मार्गिका आहे. मागील अनेक वर्षांपासून या मार्गिकेचं काम रखडलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वे प्रशासनानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता मार्गिकेचं काम करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचं काम पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यासाठी मध्य रेल्वेवर 'एमआरव्हीसी'मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळं लोकल गाड्यांसाठी प्रवास सुकर होणार आहे.

गेल्या १० वर्षांत ठाणे ते दिवा पाच आणि सहाव्या मार्गाच्या कामाला अनेक वेळा अंतिम मुदत देण्यात आली. मार्च २०१९ ही अंतिम मुदत असतानाही त्यात बदल झाला आणि डिसेंबर २०२० किंवा मार्च २०२१ पर्यंत मार्गिका पूर्ण होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

याबाबत गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाली असून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी म्हटल्याचं समजतं. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील लोकल गाड्या सामान्य प्रवाशांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं महानगरातील लोकल सेवा मागील ५ महिन्यांपासून सामान्य प्रवाश्यांसाठी बंद आहे.



हेही वाचा -

लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याची गरज

लोकलसेवा सुरू करा, अन्यथा महीना ३ हजार रूपये द्या, डबेवाल्यांची मागणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा