Advertisement

महारेरा घरंही मजबूत करणार; क्वाॅलिटी अॅश्युरन्स सर्टिफिकेट बिल्डरला बंधनकारक

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि ग्राहकांना मजबूत, चांगलं घर मिळावं यासाठी महारेरा पुढं आलं आहे. महारेराच्या परिपत्रकानुसार प्रत्येक बिल्डरला क्वाॅलिटी अॅश्युरन्स सर्टिफिकेट महारेराकडे सादर करावं लागणार आहे.

महारेरा घरंही मजबूत करणार; क्वाॅलिटी अॅश्युरन्स सर्टिफिकेट बिल्डरला बंधनकारक
SHARES

बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा काम करत आहेच. पण आता घरांच्या, इमारतीच्या बांधकामावरही महारेराची करडी नजर असणार आहे. कारण बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा योग्य आहे का यासंबंधीचं प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) आता प्रत्येक बिल्डरला महारेराकडे सादर करणं महारेरानं बंधनकारक केलं आहे. यासंबंधीचं परिपत्रक नुकतंच जारी करण्यात आलं आहे. महारारेच्या या निर्णयामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.


ग्राहकांची फसवणूक

बिल्डर वेळेत घराचा ताबा देत नाही, आराखड्याप्रमाणं बांधकाम करत नाही, करारातील क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षातील क्षेत्रफळ यात फरक असतो,  अशा एक ना अनेक प्रकारे बिल्डरकडून ग्राहकांची फसवणूक होते. पण त्याचवेळी अनेकदा बांधकाम साहित्याचा दर्जा चांगला नसल्यानं अल्पावधीतच घरात गळती होणं, फरशी निखळणं, भिंतींना भेगा पडणं अशा तक्रारी सुरू होतात. इतकंच काय तर खराब बांधकाम साहित्य वापरल्यानं इमारती कोसळल्याच्या घटनाही झालेल्या आहेत. त्यामुळं ही ग्राहकांची मोठी फसवणूक मानली जाते.


बिल्डरला बंधनकारक

या पार्श्वभूमीवर ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी आणि ग्राहकांना मजबूत, चांगलं घर मिळावं यासाठी महारेरा पुढं आलं आहे. महारेराच्या परिपत्रकानुसार प्रत्येक बिल्डरला क्वाॅलिटी अॅश्युरन्स सर्टिफिकेट महारेराकडे सादर करावं लागणार आहे. म्हणजेच नोंदणीकृत प्रकल्पातील इमारतींच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंट, रेती, लोखंड आणि इतर साहित्य यांचा दर्जा योग्य असल्यासंबंधीचं प्रमाणपत्र बिल्डरांना महारेराकडे जमा करणं यापुढं बंधनकारक असणार आहे. तर यासंबंधीची सर्व नोंद ठेवणंही बिल्डरला बंधनकारक असणार आहे.


दर्जावर विशेष लक्ष

एखाद्या प्रकल्पाबाबत ग्राहकांकडून बांधकामाबाबत, बांधकाम साहित्याबाबत तक्रार आल्यानंतर बिल्डरनं दिलेल्या प्रमाणपत्राची तपासणी केली जाईल. तर हे प्रमाणपत्र खोटं, चुकीचं असल्यास त्या बिल्डरला महारेराच्या कारवाईला सामोरं जाव लागणार आहे. त्यामुळं आता बिल्डरांना बांधकाम साहित्याच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावं लागणार असल्यानं आता बांधकामाचा दर्जा आणखी चांगला होणार असल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा - 

Exclusive: म्हाडा लाॅटरी- घरांच्या किंमती १० टक्क्यांनी होणार कमी!

कोस्टल रोडचं भूतांत्रिक सर्वेक्षण तातडीनं करा-आयुक्तांचे आदेश

सिडको लाॅटरी-विजेत्यांना दिलासा, १४ डिसेंबरपर्यंत सादर करता येणार कागदपत्र





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा