Advertisement

मेट्रो २ए, मेट्रो ७च्या कामांना विलंब होण्याची शक्यता


मेट्रो २ए, मेट्रो ७च्या कामांना विलंब होण्याची शक्यता
SHARES

मुंबईसह राज्यभरातील जनतेला कोरोनानं चांगलच घरलं आहे. कोरोनामुळं मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं असून मुंबई रेड झोनमध्ये आहे. दरम्यान या रेड झोनमुळं आणि लॉकडाऊनमुळं मुंबईतील मेट्रो कामांना ब्रेक लागला आहे. लॉकडाऊनमुळं अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली. त्यामुळं अनेक मजदुर वर्ग कमी झाला असून कामांवर गदा आली आहे. परिणामी मेट्रो २ ए (दहिसर-डीएन नगर) आणि मेट्रो -7 (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व)च्या कामांना ३ महिने विलंब होणार असल्याची माहिती मुंबई महानगर आयुक्त आरए राजीव यांनी दिली.

बरेच स्थलांतरित कामगार आपल्या राज्यात परत जात आहेत. कामगार जात असल्यानं २ ते ३ महिन्यांच्या विलंबाची अपेक्षा आहे. परिणामी डिसेंबरमध्ये सुरू होणारी मेट्रो पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता असल्याचंही राजीव यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली त्यावेळीच या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना विलंब होणार असल्याच स्पष्ट केलं होतं. मेट्रो 2A हा १८.६ किलोमीटरचा मार्ग असून या प्रकल्पासाठी ६४१० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसंच, मेट्रो ७ हा १६.५ किलोमीटरचा मार्ग असून या प्रकल्पाला ६२०८ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील अनेक ठिकाणी एमएमआरडीएने पुन्हा काम सुरू केले आहे आणि कामगार योग्य ती खबरदारी घेत आहेत. सर्व कामगार मास्क घालून काम करीत आहेत. जिथं शक्य असेल तेथे सामाजिक अंतराच्या नियमांच पालन करीत आहेत. सर्व साइटवर हँड सॅनिटायझर्स देण्यात आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा