Advertisement

मेट्रो-4 धावणार वडाळ्याऐवजी जीपीओपर्यंत


मेट्रो-4 धावणार वडाळ्याऐवजी जीपीओपर्यंत
SHARES

मुंबई - मुंबईत मेट्रोचे जाळे विणण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्यानुसार आता वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4 चा विस्तार वडाळा ते जीपीओ असा करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी एमएमआरडीएकडून नुकताच व्यवहार्यता अभ्यास सुरू करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली आहे. या विस्तारीकरणामुळे दक्षिण मुंबईकरांसाठी मेट्रोचा आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे.

14, 549 कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो-4 च्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून हा मार्ग 32 किमीचा मार्ग आहे. यात 32 स्थानकांचा समावेश आहे. या मार्गामुळे मुंबईतून थेट ठाण्याला पोहचणे सहज सोपे होणार आहे. याच मार्गाचा विस्तार वडाळा ते जीपीओपर्यंत करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या विस्तारीत मार्गामुळे सीएसटीपर्यंत पोहचणे सोपे होणार असल्याने हा मार्ग महत्त्वाचा मानला जात आहे.

मेट्रो-4 हा विस्तारीत मार्ग अंदाजे 8 किमी अंतराचा असणार आहे. तर वडाळा ते जीओपी व्हाया मुंबई पोर्ट ट्रस्ट असा हा मार्ग जाणार आहे. या मार्गासाठी अंदाजे 300 कोटी प्रति किमी असा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच विस्तारीकरणाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा