Advertisement

म्हाडाच्या पात्र विजेत्यांना पैसे भरण्यासाठी मुदतवाढ

मार्चपासून लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. तसंच अनेकांचे पगार न झाल्याने आर्थिक अडचणी भेडसावत आहेत.

म्हाडाच्या पात्र विजेत्यांना पैसे भरण्यासाठी मुदतवाढ
SHARES

 म्हाडाने पात्र विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुंबई आणि कोकण मंडळातील पात्र विजेत्यांसाठी ही मुदतवाढ लागू होणार आहे. याचा गिरणी कामगारांनाही लाभ मिळणार आहे.


मार्चपासून लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. तसंच अनेकांचे पगार न झाल्याने आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे म्हाडाने मुंबई-कोकण मंडळातील विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२० पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ दिली आहे.


मुंबई मंडळाच्या सर्वसाधारण लॉटरीतील विजेत्यांसह गिरणी कामगारांच्या लॉटरीतील ७०० पात्र विजेत्यांना तर कोकण मंडळातील २०१४, २०१६ आणि २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीतील १००० पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीतील पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या देकार पत्राची मुदत १५ मार्च २०२० पर्यंतच होती.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा