Advertisement

म्हाडाच्या मुंबई मंडळाचं सभापतीपद कुणाकडे?

म्हाडाच्या विविध मंडळावर वर्णी लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांतील नेत्यांनी फिल्डींग लावायला सुरूवात केली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाचं सभापतीपद कुणाकडे?
SHARES

भाजप सरकारच्या काळात म्हाडाच्या (mhada) विविध मंडळावर करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने भाजप नेत्यांना (bjp) देण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर शिवसेना (shiv sena) नेत्यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अधिसूचना जाहीर झाल्यानंतर आता या मंडळावर वर्णी लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांतील नेत्यांनी फिल्डींग लावायला सुरूवात केली आहे.

हेही वाचा- म्हाडा मंडळावरील नियुक्त्या रद्द, भाजप नेत्यांना फटका

निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळू न शकणाऱ्या नेत्यांची वर्णी राज्य सरकारच्या विविध महामंडळांवर लावण्यात येते. त्यानुसार मागील युती सरकारच्या काळात भाजप आणि शिवसेना नेत्यांची वेगवेगळ्या महामंडळांवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकार सत्तेत आल्याने या सरकारने जुन्या नियुक्त्या रद्द करायला सुरूवात केली आहे.  

त्यानुसार म्हाडाच्या विविध मंडळांवर करण्यात आलेल्या राजकीय व्यक्तींच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला होता. उदय सामंत (uday samant) यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद देण्यात आल्याने त्यांचे म्हाडा अध्यक्षपद रद्द करण्यात आलं. मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण (madhu chavan), नागपूर मंडळाचे तारिक कुरेशी, कोकण मंडळाचे बाळासाहेब पाटील, औरंगाबाद मंडळाचे संजय केणेकर, नाशिक मंडळाचे बबन चौधरी आणि पुणे मंडळाचे उपसभापती विक्रम पाटील या भाजप नेत्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. 

तर, म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर (vinod ghosalkar), मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे विजय नहाटा आदी शिवसेना नेत्यांची पदे कायम ठेवण्यात आली आहेत. दरम्यान या अधिसूचनेची अंमलबजावणी होण्याआधी मधु चव्हाण यांनी आपलं पद सोडलं आहे. 

हेही वाचा- म्हाडा बांधणार नॅनो घरे, किंमत असणार ‘इतकी’

त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर लवकरच महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) सामील पक्षांतील नेत्यांची नियुक्ती होऊ शकते. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांतील नेत्यांनी फिल्डींग लावायला सुरूवात केली आहे. शिवसेकडे आधीच काही पदं असल्याने तसंच राष्ट्रवादीकडे गृहनिर्माण मंत्रालय (housing ministry) असल्याने म्हाडाच्या उर्वरीत पदांसाठी राष्ट्रवादीकडून (ncp) जोर लावण्यात येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. तर काँग्रेसही (congress) म्हाडात पद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा