Advertisement

माहुलवासीयांसाठी म्हाडा देणार ३०० संक्रमण शिबिराचे गाळे

माहुलवासीयांना घरं मिळावीत यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्याबरोबर ३० आॅक्टोबरला बैठक घेतली होती. या बैठकीत म्हाडानं गोराई आणि इतर परिसरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील ३०० गाळे देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार बुधवारी म्हाडा प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत म्हाडानं ही ३०० संक्रमण शिबिर गाळे देण्यास मंजुरी दिल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

माहुलवासीयांसाठी म्हाडा देणार ३०० संक्रमण शिबिराचे गाळे
SHARES

माहुल प्रकल्पग्रस्त वसाहतीत नरकयाताना भोगणाऱ्या किमान ३०० माहुलवासीयांचं जगणं लवकरच सुकर होणार आहे. कारण ३०० माहुलवासीयांची सुटका होऊन ते म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहायला जाणार आहेत. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील ३०० गाळे माहुलवासीयांना देण्यास म्हाडा प्राधिकरणाने मंजुरी दिल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. सुमारे ५ हजार माहुलवासीयांपैकी संक्रमण शिबिरात जाणारे ३०० माहुलवासीय नेमके कोण असतील? हे मुंबई महापालिका आणि ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन ठरवतील, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.


जगणं मुश्कील

रस्ते आणि विविध प्रकल्पांसाठी वांद्रे, अंधेरी, कुर्ला, साकीनाका, विद्याविहार, अंबुजवाडी, मांडला आणि इतर परिसरातील प्रकल्पवासीयांचं पुनर्वसन महापालिकेने माहुल इथं केलं आहे. पण माहुलचा हा परिसर अतिशय बकाल आणि अस्वच्छ आहे. इथं रिफायनरी असल्यानं इथलं वातावरण देखील प्रदूषित झालं आहे. शौचालयापासून पिण्याच्या पाण्यापर्यंतचा प्रश्न इथं गंभीर आहे. या वातावरणामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत कित्येक माहुलवासीयांचा बळीही गेला आहे. त्यामुळं या नरकयातेनतून सुटका व्हावी यासाठी माहुलवासीय रस्त्यावर आणि न्यायालयात लढाई लढत आहेत.


म्हाडाची मंजुरी

दरम्यान माहुलवासीयांना घरं मिळावीत यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्याबरोबर ३० आॅक्टोबरला बैठक घेतली होती. या बैठकीत म्हाडानं गोराई आणि इतर परिसरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील ३०० गाळे देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार बुधवारी म्हाडा प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत म्हाडानं ही ३०० संक्रमण शिबिर गाळे देण्यास मंजुरी दिल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.


भाडं आकारणार

त्यानुसार या ३०० गाळ्यांचा ताबा महापालिकेकडे देण्यात येईल. त्यानंतर महापालिका रहिवाशांची यादी तयार करत नेमकी ही घर कशी आणि कुणाला द्यायची हे ठरवेल, असंही सामंत यांनी सांगितलं आहे. तर या रहिवाशांकडून महापालिका ५०० रुपये भाडं आकारेल आणि ती रक्कम म्हाडाला देईल, असंही या प्रस्तावात नमूद करण्यात आल्याचं समजत आहे.हेही वाचा-

मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्यास आझाद मैदानातच ठिय्या, माहुलवासीयांचा निर्धार

माहुलवासीयांना कुर्ल्यातील संक्रमण शिबिरांत हलवणारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा