Advertisement

म्हाडा उभारणार वसईत छोटं शहर, इतक्या घरांची लाॅटरी काढणार

वसईत छोटं शहर उभारण्याची योजना म्हाडाच्या कोकण मंडळाने आखली आहे. वसईतील राजोळी परिसरातील सुमारे १२५ एकर जागेवर खासगी-सार्वजनिक सहभागातून (पीपीपी) हे शहर उभारण्यात येणार आहे.

म्हाडा उभारणार वसईत छोटं शहर, इतक्या घरांची लाॅटरी काढणार
SHARES

वसईत छोटं शहर उभारण्याची योजना म्हाडाच्या कोकण मंडळाने आखली आहे. वसईतील राजोळी परिसरातील सुमारे १२५ एकर जागेवर खासगी-सार्वजनिक सहभागातून (पीपीपी) हे शहर उभारण्यात येणार आहे. ही योजना प्रस्तावित असून या योजनेला मंजुरी मिळताच कोकण मंडळाकडून काम हाती घेण्यात येईल. 

मोकळ्या जमिनींचा अभाव

सद्यस्थितीत मुंबई शहरात मोकळ्या जागा उपलब्ध नसल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाला गृहनिर्मिती करण्यास असंख्य अडचणी येत आहेत. यामुळे मुंबई मंडळाने म्हाडाच्या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासातून उपलब्ध होणाऱ्या हाऊसिंग स्टाॅककडे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातुलनेत कोकण मंडळाचा भर मोकळ्या जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याकडे आहे.  

खासगी सहभागातून

त्यानुसार कोकण मंडळाने वसईतील राजोळीत खासगी-सरकारी (PPP) सहभागातून ५२ हजार घरांची योजना हाती घेतली आहे. राजोळीतील सुमारे १२५ एकर जमिनीवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ही जमीन पूर्णपणे खासगी असून म्हाडाच्या सहकार्याने या जमिनीवर गृहनिर्मिती झाल्यास या प्रकल्पाला अतिरिक्त चटई क्षेत्रफळाचा लाभही घेता येऊ शकेल. या जमिनीवर गृहनिर्मितीसाठी १ चटई क्षेत्रफळ उपलब्ध होते. परंतु म्हाडाच्या सहभागामुळे या गृहप्रकल्पाला अडीच चटई क्षेत्रफळ मिळू शकेल. यातून तयार होणाऱ्या घरांपैकी २५ हजार घरं म्हाडाच्या कोकण मंडळाला मिळू शकतील.  

घरांसोबतच या गृहनिर्माण प्रकल्पात व्यावसायिक गाळे, बाजारपेठ, उद्याने, कम्युनिटी हाॅल, मनोरंजन स्थळ इ. देखील उपलब्ध करून देण्यात येईल. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा २५ हजार घरांमध्ये अत्यल्प, अल्प उत्पन्न गटांतील घरांचा समावेश असेल. ही घरं लाॅटरी पद्धतीने वितरीत केली जातील.   

‘पीएमएवाय’ योजनेंतर्गत घरं

याशिवाय म्हाडाच्या कोकण मंडळाने पंतप्रधान आवास योजने (PMAY) अंतर्गत कल्याण, भंडार्ली, खोणी इ. भागांमध्येही गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतले आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून २४ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये शिरढोण (कल्याण )- ९,४२१, खालापूर (वासरन)-५,०१०, खोणी (कल्याण )-४ हजार, रत्नागिरी (नाचणे)-७३२, खोपोली-५६०, चिपळूण (रावतळे)- ४१८, दापोली (जोगने )-२८०, ठाणे (मिरारोड)- १९८, बदलापूर (जावेली) -१,०३९, कल्याण (म्हारळ)-१,७७०, टिटवाळा-९१२ या घरांचा समावेश आहे. 



हेही वाचा-

म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याला सुप्रिम कोर्टाची स्थगिती

दिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा