म्हाडाकडून मुंबई पोलिसांसाठी विरार इथं 'इतकी' घरं

विरार येथे पोलिसांच्या गृहनिर्माण सोसायट्या उभारण्यात येणार आहेत.

म्हाडाकडून मुंबई पोलिसांसाठी विरार इथं 'इतकी' घरं
SHARES

म्हाडाकडून मुंबई पोलिसांना विरार येथे घरं देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मुंबई पोलिसांसाठी विरार येथे १८६ घरांसाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे. अनेक वर्षांसाठी पोलिसांकडून घरांची मागणी होत आहे. गृहविभागाने यासाठी विशेष प्रस्ताव तयार केला होता. त्याअंतर्गत म्हाडाने पोलिसांच्या घरांसाठी विरारसह पनवेलमधे जागा निश्‍चित केली आहे.

 केंद्र सरकाच्या २०२२ पर्यंत सगळ्यांसाठी घरे या योजनेत पोलिसांना खासगी मालकीची घरे देण्याचे म्हाडा प्रशासनाने जाहीर केले आहे. या घरांच्या किंमतीही कमी असणार आहेत. सगळ्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावी ही राज्य सरकारची योजना आहे. या योजनेसाठी मुंबईत अनेक ठिकाणी महसूल तसंच सरकारच्या अन्य विभागांसाठी जागा शोधण्याचे काम संबंधित विभागांना देण्यात आलं आहे. 

मुंबईत परवडणाऱ्या घरांसाठी जागाच शिल्लक नसल्याने ठाणे, रायगड, पालघर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल या महापालिकांच्या हद्दीतील जागा बघण्यात येत आहेत. विरार येथे पोलिसांच्या गृहनिर्माण सोसायट्या उभारण्यात येणार आहेत, असं म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.  पंतप्रधान आवास योजनेखाली प्रत्येक घरासाठी २.८५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांना कमी किमतीत घरं मिळतील. हेही वाचा  -

मुंबईत अवघे १५ वाहनतळ, लाखो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम

बीकेसी, माझगावची हवा सर्वाधिक दूषित
संबंधित विषय