Advertisement

बीकेसी, माझगावची हवा सर्वाधिक दूषित

मुंबई शहरात आणि उपनगरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असते. त्यामुळे वायुप्रदुषण प्रचंड वाढलं आहे.

बीकेसी, माझगावची हवा सर्वाधिक दूषित
SHARES

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे.  वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), नवी मुंबई,  माझगाव या ठिकाणची हवा प्रदुषित असल्याचं दिसून आलं आहे.  हवेची गुणवत्ता नोंदविणाऱ्या ‘सफर’ या संकेतस्थळाने या तिन्ही ठिकाणी हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचं प्रमाण अधिक असल्याचं नोंदवलं आहे.

 हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचं प्रमाण जास्त असल्याने बीकेसी, माझगाव आणि नवी मुंबईतील हवा आरोग्यासाठी वाईट असल्याचं मानलं जातंय. मुंबईत माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, चेंबूर तसंच नवी मुंबई या परिसरातील वातावरण सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. येथील  हवेत सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक असल्याचं नोंदवण्यात आलं  आहे.

दिल्लीपाठोपाठ मुंबईही प्रदुषणाच्या विळख्यात जात असल्याचं दिसून येत आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असते. त्यामुळे वायुप्रदुषण प्रचंड वाढलं आहे. मागील काही दिवसात मुंबई शहर आणि उपनगरातील हवा समाधानकारक नोंदविण्यात येत आहे. मात्र, नवी मुंबईमधील हवा अत्यंत वाईट असल्याचं नोंदविण्यात येत आहे.

 
हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण 
बीकेसी : ३०१ अत्यंत वाईट
नवी मुंबई : २३९ वाईट
माझगाव : २०२ वाईट
बोरीवली : १२४ मध्यम
मालाड : १६१ मध्यम
भांडुप : ८२ समाधानकारक
अंधेरी : १४३ मध्यम
चेंबूर : ९५ समाधानकारक
वरळी : १४६ समाधानकारक
कुलाबा : ९३ समाधानकारक



हेही वाचा -

मुंबई बंदरात ४ आलिशान क्रुझचं आगमन

तारापोरवाला मत्स्यालयात मासे कमी, पर्यटक नाराज




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा