म्हाडाचा फुसका बार, मुंबईतील 12,729 घरं कागदावरच?

अंदाजे 5 हजार घर पुढच्या दोन वर्षात अर्थात 2020 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन मुंबई मंडळाचं होतं. पण प्रत्यक्षात मात्र मंडळानं आतापर्यंत 2018 पर्यंतच्या उद्दिष्ट्यानुसार 10576 पैकी केवळ 2500 घरांचं उद्दिष्ट्य पूर्ण केलं आहे. त्यामुळे अजूनही 8 हजार घर बांधली गेलेली नाहीत. तर पुढच्या दोन वर्षतील 2020 पर्यंतच्या 5000 घरांच्या बांधणीसाठी तर मंडळानं अद्याप पर्यंत कोणतंही पाऊल उचललेलं नाही.

SHARE

म्हाडाच्या मुंबई मंडळानं 2020 पर्यंत 15 हजार 229 घरं बांधत गरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं होतं. पण हे उद्दिष्ट्य गाठण्यात मुंबई मंडळ साफ फेल ठरलं आहे. हे आम्ही म्हणत नाही तर हे म्हणत आहेत चक्क म्हाडाचे नवनियुक्त अध्यक्ष उदय सामंत.

2020 पर्यंत 15 हजार 229 घराचं उद्दिष्ट्य मंडळाचं होत. पण आतापर्यंत केवळ 2500 घर मार्गी लागली आहेत. तर उर्वरित 12,729 घरं बांधण्यासाठी मुंबई मंडळाकडून अद्यापपर्यंत कोणतीही पाऊल उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे 12,729 घर केवळ कागदावरच राहणार असल्याची स्पष्ट कबुली सामंत यांनी थेट प्रसार माध्यमांसमोर दिली आहे. त्यांच्या या कबुलीमुळ आता चांगलीच खळबळ उडण्याची शक्यता आहे.


पण यश नाही

लॉटरीद्वारे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक मंडळाला पुढच्या काही वर्षात कुठं आणि किती घर बांधणार याचा आराखडा द्यावा लागतो. तर पंचवार्षिक घरबांधणीचाही कार्यक्रम सादर करावा लागतो. त्यानुसार मुंबई मंडळाने 2015 ते 2020 पर्यंत 15 हजार 229 घराचं उद्दिष्ट्य ठेवलं होतं. हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी मंडळानं प्रयत्न केले खरे पण त्यात त्यांना यश आलं नसल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.


फक्त 2500 घरांचं उद्दिष्ट्य पूर्ण

सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार 15,229 पैकी 10,576 घरं 2018 पर्यंत तर उर्वरित अंदाजे 5 हजार घर पुढच्या दोन वर्षात अर्थात 2020 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन मुंबई मंडळाचं होतं. पण प्रत्यक्षात मात्र मंडळानं आतापर्यंत 2018 पर्यंतच्या उद्दिष्ट्यानुसार 10576 पैकी केवळ 2500 घरांचं उद्दिष्ट्य पूर्ण केलं आहे. त्यामुळे अजूनही 8 हजार घर बांधली गेलेली नाहीत. तर पुढच्या दोन वर्षतील 2020 पर्यंतच्या 5000 घरांच्या बांधणीसाठी तर मंडळानं अद्याप पर्यंत कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे ही घरंही होणार नसल्याचं सामंत यांचं म्हणणं आहे.


गरिबांच्या आशेवर पाणी

एकूणच 2015 ते 2020 पर्यंतच्या पंचवार्षिक घर योजनेतील 15229 घरांपैकी केवळ 2500 घरं मार्गी लागली आहेत. तर तब्बल 12,729 घरं हवेत, कागदावर आहेत. गरीब मुंबईकर म्हाडाकडे मोठ्या आशेनं पाहत असताना हे वास्तव त्यांच्या आशेवर पाणी टाकणार आहे. तर मुंबई मंडळाच्या याच थंड धोरणांमुळे गेल्या काही वर्षांपासून 800 ते 1000 घरांची लॉटरी निघत आहे. जुनी धूळखात पडून असलेली घरं शोधून काढावी लागत आहेत. त्यामुळे आता तरी मुंबई मंडळानं गरीबांच्या घरासाठी ठोस पाऊलं उचलावीत अशीच सर्वांची मागणी असेल.


हेही वाचा - 

म्हाडातील महिला अधिकाऱ्याला बेड्या; बनावट व्हेकेशन नोटिशीद्वारे घर देणं भोवलं

गुडन्यूज! म्हाडाची सर्व गटातील घरं होणार स्वस्त!!

संबंधित विषय
ताज्या बातम्या