गृहस्वप्नात आचारसंहितेचा खोडा

 Pali Hill
गृहस्वप्नात आचारसंहितेचा खोडा

मुंबई - गिरणी कामगार एमएमआरडीएच्या घरांच्या सोडतीची प्रतिक्षा करतीयेत. पण ही प्रतिक्षा काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकार, एमएमआरडीए आणि म्हाडाच्या उदासीनतेमुळे एकीकडे सोडत रखडलेली आहे. त्यात आता आचारसंहितेमुळे सोडत लांबणार असल्याचे सांगत सरकारनं पुन्हा एकदा गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.

एमएमआरडीएच्या घरांसाठी सोडत काढावी या मागणीसाठी मंगऴवारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात गिरणी कामगार उपोषणाला बसणार होते. मात्र मुख्य सचिवांनी सोडतीसंदर्भात बैठक बोलावल्यानं कामगारांनी उपोषण स्थगित केले. त्यानुसार मंगळवारी दुपारी पार पडलेल्या बैठकीत डिसेंबरपर्यंत सोडत काढता येईल असे एमएमआरडीए-म्हाडाकडून सांगण्यात आले. पण ही घरे पनवेलमध्ये असून पनवेलमध्ये आचारसंहिता लागू असल्याने सोडत काढता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गिरणी कामगारांची गृहस्वप्नपूर्तीही सरकारी उदासीनतेमुळे लांबलीय.

Loading Comments