Advertisement

एमएमआरडीच्या विजेत्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ


एमएमआरडीच्या विजेत्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ
SHARES

एमएमआरडीएच्या घरांसाठी विजेत्या ठरलेल्या गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता या विजेत्यांना 9 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार आहेत.

मुंबई मंडळाने 2 डिसेंबर 2016 मध्ये सहा गिरण्यांमधील 2417 घरांसाठी लॉटरी काढली होती. या लॉटरीतील विजेत्यांची पात्रता निश्चिती करण्यासाठी मंडळाने कागदपत्रे जमा करून घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, गिरणी कामगारांना कागदपत्रे  जमा करत ती सादर करण्यास विविध कारणाने विलंब होत आहे. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्याप्रमाणे 4 ऑगस्टपासून 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मात्र, या मुदतवाढीनंतरही अद्याप 418 विजेत्या गिरणी कामगारांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे, अशा गिरणी कामगारांची संधी जाऊ नये, यासाठी मंडळाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता 9 नोव्हेंबरपर्यंत विजेत्यांना कागदपत्रे सादर करता येणार आहेत.



हेही वाचा

'एमएमआरडीए' झोपड्यांचा भाग देणार महापालिकेला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा