Advertisement

लोखंडवाला-कांजुरमार्ग मेट्रो-६ चे काम अखेर ट्रॅकवर

'एमएमआरडीए'ने मेट्रो-६ प्रकल्पातील आयआयटी ते विक्रोळी मार्गाच्या बांधकामासाठी दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशन (डिएमआरसी)कडून निविदा मागवल्या आहेत. हे काम मार्गी लागल्यास मुंबईकरांच्या सेवेत पुढच्या काही वर्षांत आणखी एक मेट्रो मार्ग दाखल होईल.

लोखंडवाला-कांजुरमार्ग मेट्रो-६ चे काम अखेर ट्रॅकवर
SHARES

मुंबईत अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा चंग बांधलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने मेट्रो प्रकल्पातील कामांच्या शुभारंभाचा धडका लावला असून लवकरच लोखंडवाला-जोगेश्वरी-कांजुरमार्ग मेट्रो-६ च्या कामाचंही उद्घाटन होणार आहे.

'एमएमआरडीए'ने मेट्रो-६ प्रकल्पातील आयआयटी ते विक्रोळी मार्गाच्या बांधकामासाठी दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशन (डिएमआरसी)ने निविदा मागवल्या आहेत. हे काम मार्गी लागल्यास मुंबईकरांच्या सेवेत पुढच्या काही वर्षांत आणखी एक मेट्रो मार्ग दाखल होईल.


मेट्रोमार्ग प्रगतीपथावर

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो-१ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)च्या माध्यमातून मेट्रो-३ अर्थात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचं काम वेगात सुरू आहे. दुसरीकडे दहिसर-अंधेरी मेट्रो-७ आणि मेट्रो-२ 'अ' चं काम 'एमएमआरडीए'कडून वेगात सुरू आहे. तर मेट्रो-२ 'ब' आणि मेट्रो-४ वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मार्गाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.


'डीएमआरसी'कडे पूर्ण जबाबदारी

एकूण १४.४७ किमी लांबीच्या आणि अंदाजे ६ हजार ६७२ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो मार्गाच्या उभारणीची संपूर्ण जबाबदारी 'एमएमआरडीए'ने 'डीएमआरसी'कडे सोपवली आहे. या प्रकल्पाला काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर 'डीएमआरसी' कामाला लागले आणि अखेर आता 'डीएमआरसी'ने मेट्रो-६ प्रकल्पातील पवई आयआयटी ते विक्रोळी मार्गासह तीन उन्नत मेट्रो स्थानकाचं डिझाईन तयार करणं आणि बांधकामासाठी निविदा मागवल्या आहेत.


महत्त्वाचा मार्ग

दरम्यान या मेट्रो मार्गामुळे पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर थेट एकमेकांशी जोडलं जाणार असून लोखंडवाला ते कांजुरमार्ग हे अंतर काही मिनिटांतच पार करणं मुंबईकरांना शक्य होणार आहे. त्यामुळे हा मेट्रो मार्ग मुंबईकरांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे.


१३ स्थानके अशी

  • लोखंडवाला-जोगेश्वरी-कांजुरमार्ग मेट्रो-६
  • स्वामी समर्थ नगर, आदर्श नग, मोमीन नगर, जेव्हीएलआर, श्याम नगर, महाकाली केव्हज, सीप्झ व्हिलेज, साकी विहार रोड, राम बाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजुरमार्ग आणि विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग
  • १४.४७ किमीचा मार्ग
  • अंदाजित खर्च ६६७२ कोटी रुपये
  • एकूण १३ स्थानके
  • २०१८ मध्ये कामाला सुरूवात
  • २०२२ पर्यंत काम पूर्ण करत हा मार्ग सेवेत दाखल करण्याचा मानस



हेही वाचा-

नाहीतर मेट्रो ३ ला ब्रेक लावू, उच्च न्यायालयाने 'एमएमआरसी'ला ठणकावलं

दादर, माहिमकरांनाही मेट्रो-३ ‘नकोशी’, फूटपाथला भेगा, भिंतींना तडे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा