Advertisement

मेट्रो-7चे काम संथगतीने; एमएमआरडीएची कंत्राटदारांना तंबी


मेट्रो-7चे काम संथगतीने; एमएमआरडीएची कंत्राटदारांना तंबी
SHARES

मेट्रो-7 च्या दहिसर ते अंधेरी या पट्ट्याचे काम सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)कडून सुरू आहे. या मार्गाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करत हा मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल करून देण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रमानुसार कंत्रटादारांनी काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र मेट्रो-7 मधील कंत्राटदाराकडून काम संथगतीने सुरू असल्याने आता एमएमआरडीए कंत्राटादारांवर चांगलीच नाराज झाली आहे. यासंदर्भात एमएमआरडीएने तीन कंत्राटदारांना नोटिसा पाठवत कामाची गती वाढवण्याची तंबी दिली आहे.

16.5 किमी अंतराच्या मेट्रो मार्गाचे बांधकाम (सिव्हिल वर्क) 2019 मध्ये पूर्ण करण्याचे टार्गेट एमएमआरडीएने ठेवले आहे. मात्र कंत्राटदारांकडून चालढकल होत असल्याचं समोर आलं आहे. मे. जे. कुमार, मे. सिम्प्लेक्स आणि मे. एनसीसी लिमिटेड या तीन कंत्राटदारांचा यात समावेश आहे.


कामगारांच्या पटसंख्येत घोळ!

एनसीसी कंपनीकडून 600 कामगारांच्या माध्यमातून काम करणे अपेक्षित असताना एमएमआरडीएला साईटवर केवळ 318 कामगारच असल्याचे निर्दशनास आले. तर सिम्प्लेक्सकडून 600 पैकी केवळ 320 आणि जे. कुमारकडून 600 पैकी 395 कामगार साईटवर असल्याचे समोर आले आहे. कामगार कमी असल्याने साहजिकच त्याचा परिणाम कामावर झाल्याचे एमएमआरडीएने म्हणणे आहे.


नियोजनानुसार कामं होतच नाहीत!

याशिवाय पायलिंग रिंग, टी गर्डर्स, पियर अशा अनेक प्रकारच्या कामांची आखणी करत ही कामे ठराविक वेळेत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र ही कामेही कंत्राटदारांकडून पूर्ण करण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच एमएमआरडीएने नोटिसा पाठवल्या आहेत. आता या नोटीसला कंपन्या काय उत्तर देतात? हेच पाहणे महत्त्वाचे आहे.

पुढच्या वर्षापर्यंत सिव्हिल वर्क पूर्ण करत 2019 पर्यंत मेट्रो सेवेत आणण्याचा मानस आहे. त्यामुळे नियोजनानुसार काम होते की नाही हे तपासले जाते. होत नसेल तर काम वेगात करण्यासंबंधीचे आदेश कंत्राटदारांना दिले जातात. त्यामुळे कंत्राटदारांना पाठवण्यात आलेल्या नोटीसा हा आमच्या दैनंदिन कामाचा भाग आहे.

दिलीप कवठकर, सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क)

दरम्यान, कंपन्यांकडून मात्र उलट अडचणींचा पाढा वाचला जात असल्याचे समजते आहे. कामगारांची टंचाई असल्याचे आणि काम करण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगत कंपन्या त्यांची बाजू मांडत असल्याचेही समजते आहे. मात्र लेखी स्वरुपात अद्याप कोणतीही माहिती एमएमआरडीएला कंपन्यांकडून मिळालेली नाही.हेही वाचा

मेट्रो-2 ब साठी MMRDA वर पुन्हा निविदा काढण्याची नामुष्की


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा