एमटीएचएल प्रकल्पाच्या निविदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 Pali Hill
एमटीएचएल प्रकल्पाच्या निविदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात शिवडी-न्हावा-शेवा सागरी मार्ग प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवल्या होत्या. तीन टप्प्यांत मागवण्यात आलेल्या या निविदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

तीन टप्प्यासाठी 50 कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यातील 29 कंपन्यांच्या निविदा स्वीकारत या कंपन्यांना एमएमआरडीएने शाँर्टलिस्ट केले आहे. आता या 29 कंपन्यांमधून अंतिम कंत्राटदारांची निवड करण्यात येईल. या प्रक्रियेला किमान सहा महिन्यांचा अवधी अपेक्षित आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच एमटीएचएलच्या प्रकल्पाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान 22 किमी अंतराच्या या प्रकल्पासाठी 17 हजार 500 कोटी खर्च अपेक्षित अाहेत. मुंबईकरांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Loading Comments