एमएमआरडीएचा ‘मेट्रो’ अर्थसंकल्प

  Mumbai
  एमएमआरडीएचा ‘मेट्रो’ अर्थसंकल्प
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा चंगच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधला आहे. कारण, बुधवारी जाहीर झालेल्या एमएमआरडीएच्या 2017-18 च्या 6976.50 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात 3 हजार 210 कोटींची तरतूद केवळ आणि केवळ मेट्रो प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे एमएमआरडीएचा हा मेट्रो अर्थसंकल्प असल्याचे बोलले जात आहे.

  एमएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सात मेट्रो प्रकल्पांसाठी 3,210 कोटींची, एमटीएचएल (शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्ग)साठी 1,200 कोटींची, एमएमआरच्या विकासासाठी 700 कोटींची, जलस्त्रोतांच्या विकासासाठी 300 कोटींची, मोनोरेल टप्पा-2 साठी 208 कोटींची तर वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विकासासाठी 75 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 50 कोटींची विशेष तरतुदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

  वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विकासासाठी 75 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्याद्वारे बीकेसीला स्मार्ट सिटी योजना करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर 300 कोटींची तरतूद असलेल्या जलस्त्रोत प्रकल्पांद्वारे एमएमआरमधील गावांना मुलबक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी विविध योजना राबवण्यात येणार असून या योजनेच्या कामाला यावर्षीच सुरूवात होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त युपीएस मदान यांनी दिली आहे. तर एमएमआरसाठी जी 700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, त्या तरतुदीच्या माध्यमातून एमएमआरमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

  अर्थसंकल्पाचे वैशिष्टय - एकूण अर्थसंकल्प - 6976.50 कोटी

  1) मेट्रो प्रकल्प - एकूण तरतूद - 3273 कोटी 25 लाख
  अ - मेट्रो-2 - डीएन नगर ते दहिसर - 1000 कोटी
  ब - मेट्रो-2 ब - डीएऩ नगर ते मंडाले - 200 कोटी
  क - मेट्रो-4 - वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली - 200 कोटी
  ड - मेट्रो-5 - ठाणे-भिवंडी-कल्याण - 5 कोटी
  च - मेट्रो-6 - कांजुरमार्ग समर्थनगर-जेव्हीएलआर-सिप्झ-विक्रोळी - 5 कोटी
  छ - मेट्रो-7-अ - अंधेरी (पू) ते दहिसर (पू) - 1000 कोटी
  ज - मेट्रो-3 - कुलाबा-वांद्रे-सिप्झ (एमएमआरसी) - 800 कोटी
  झ - मुंबई मेट्रो रेल प्रकल्प-वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर - 63.25 कोटी
  2) एमटीएचएल - 1200 कोटी
  3) मोनोरेल - 208 कोटी
  4) एमयुआयपी - 70 कोटी
  5) विस्तारीत एमयुटीपी - 600 कोटी
  6) जलस्त्रोत विकास - 300 कोटी
  7) एमएमआरमधील बाह्य रस्त्यांचा विकास - 100 कोटी
  8) बीकेसी विकास - 75 कोटी
  9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - 50 कोटी
  10) वडाळा ट्रक टर्मिनस - 15 कोटी
  11) मिठी नदी विकास - 5 कोटी
  12) एमएमआरमधील भाडेतत्वावरील निवासस्थान - 40 कोटी
  13) एससीएलआर विस्तारीकरण तसेच कुर्ला संकुल ते पश्चिम द्रुतगती मार्ग 50 कोटी
  14) छेडानगर उन्नत मार्ग - 20 कोटी
  15) इलेक्ट्रीक बस खेरदी - 51 कोटी
  16) स्मार्ट सिटी - 40 कोटी
  17) इतर संकीर्ण प्रकल्पांवरील खर्च - 148.70 कोटी
  18) एमयुटीपी-1 - 106.50 कोटी

  19) एकूण कर्ज - 102 कोटी
  20) सर्व्हेक्षण आणि अभ्यास - 35.85 कोटी
  21) अनुदान - 108.90 कोटी
  22) प्रशासकीय आणि भांडवली खर्च - 196.30 कोटी
  23) सुरक्षा ठेव आणि इतर खर्च - 181 कोटी

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.