Advertisement

मुंबईत पालिका अंडरग्राऊंड मार्केट उभारणार

दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत देखील पालिका लवकरच अंडरग्राऊंड मार्केट सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

मुंबईत पालिका अंडरग्राऊंड मार्केट उभारणार
SHARES

दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत देखील पालिका लवकरच अंडरग्राऊंड मार्केट सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी नुकतीच दिल्लीतील कॅनॉट येथील 'पालिका बाजार'ला भेट दिली. पुढील आठवड्यापर्यंत पालिका अधिकारी आपला अहवाल मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना सादर करतील. अशा फेरीवाला बाजार उभारण्यासाठी वॉर्ड अधिका-यांना आपापल्या वॉर्डात योग्य मोकळी जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फेरीवाला धोरण लागू न झाल्याने शहरातील रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केसरकर यांनी दिल्ली पालिका बाजाराच्या धर्तीवर भूमिगत बाजार उभारण्याची सूचना केली. 

डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन (DCPR) 2034 मध्ये सार्वजनिक खुल्या जागा आणि शहरातील क्रीडांगणे आणि उद्यानांसाठी राखीव असलेल्या जमिनींच्या खाली शॉपिंग हब देखील प्रस्तावित आहेत. निर्देशांनंतर, बाजार आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी दिल्लीतील पालिका बाजाराला भेट दिली.

मार्केट हे दिल्लीतील कॅनॉटच्या आतील आणि बाहेरील वर्तुळाच्या दरम्यान स्थित एक भूमिगत बाजारपेठ आहे. यामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारी 398 दुकाने आहेत.

"अंडरग्राऊंड मार्केट 20,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर असून त्यावर एक मोठी बाग आहे. मार्केटमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी सात दरवाजे आहेत. हे ठिकाण प्रमुख रस्ते आणि राजीव चौक मेट्रो रेल्वे स्टेशनला जोडलेले आहे. सविस्तर पालिका बाजाराबाबतचा अहवाल पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांना सादर केला जाईल. नागरी उद्यान विभाग या प्रकल्पावर काम करेल, असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले.

नागरी अधिकाऱ्यांनी 24 प्रशासकीय वॉर्डांच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना क्रीडांगण किंवा उद्यान यांसारख्या मोकळ्या जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत ज्यांच्या खाली भूमिगत बाजार उभारता येतील. ज्या ठिकाणी जास्त लोकवस्ती असेल अशा रेल्वे स्थानकांच्या जवळ असलेल्या जागेला प्राधान्य दिले जाईल, असे नागरी सूत्रांनी सांगितले.हेही वाचा

BMC Budget 2024 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर">BMC Budget 2024 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

राज्यातील निवासी डॉक्टरांचा 7 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा