Advertisement

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या 'या' तारखेला बंद

प्रवाशांनी शेड्युल्ड फ्लाइट्सबाबत संबंधित एअरलाईनकडे चौकशी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या 'या' तारखेला बंद
(File Image)
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या १० मे रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळावरील पावसाळ्यापूर्वीची कामं करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावरील रनवे RWY 14/32 आणि 09/27 १० मे २०२२ रोजी मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कार्यरत नसणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या बंद असतील. याबाबत विमानतळ प्राधिकरणानं नोटीस जाहीर केली आहे.

संध्याकाळी ७ नंतर सर्व सेवा पुन्हा सुरळीत नेहमीप्रमाणे सुरू होतील. त्यामुळे प्रवाशांनी १० मे रोजीच्या शेड्युल्ड फ्लाइट्सबाबत संबंधित एअरलाईनकडे चौकशी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. आपत्कालीन ऑपरेशनमध्ये विमानतळावरील धावपट्टी वर्षातून एकदा बंद केली जाते. जेणेकरून धावपट्टीची देखभाल आणि दुरुस्ती करून आवश्यक त्या सुरक्षा घेणे शक्य होते.

दरम्यान, २७ मार्च ते २७ एप्रिल २०२२ पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यापासून एका महिन्यात, मुंबईच्या CSMIA नं सुमारे ६.३ लाख प्रवाशांनी प्रवास केला.



हेही वाचा

जूनपासून भाडेवाढीचा टॅक्सी संघटनाचा इशारा

एसी लोकलचे भाडे यापुढे कमी करणं अशक्य - व्हीके त्रिपाठी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा