Advertisement

अरेरे, म्हाडाच्या १६ घरांना शून्य प्रतिसाद


 अरेरे, म्हाडाच्या १६ घरांना शून्य प्रतिसाद
SHARES

म्हाडाच्या ८१९ घरांपैकी १६ घरांना यंदा शून्य प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षीप्रमाणे आजी-माजी आमदार-खासदार, म्हाडा कर्मचारी आणि अंध-शारिरीकदृष्ट्या अपंग, संरक्षण दल आणि स्वातंत्र्य सैनिक या गटातील ही घरं आहेत.


म्हणून या घरांना शून्य प्रतिसाद

सामाजिक आरक्षणाबरोबरच म्हाडा लाॅटरीत आजी-माजी आमदार-खासदारांना आरक्षण देण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अत्यल्प आणि अल्प गटातील घरांसाठीही या वर्गाला आरक्षण आहे. बघायला गेलं तर या वर्गातील व्यक्ती अत्यल्प आणि अल्प गटात समाविष्टच होत नाहीत. म्हणजेच २५ हजार ते ५० हजारापर्यंत उत्पन्न असणारे आजी-माजी आमदार-खासदार शोधूनही सापडणार नाही. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यल्प आणि अल्प गटातील या वर्गासाठी असलेल्या घरांना शून्य प्रतिसाद मिळतो आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा मध्यम गटातील घरांसाठीही या वर्गाकडून अर्ज आलेले नाहीत.


'त्यांना' आरक्षण कशासाठी? 

सर्वसामान्यांसाठी घरं अपुरी ठरत असताना या वर्गासाठी घरे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच या वर्गाचं अत्यल्प आणि अल्प गटातील म्हाडा लाॅटरीतील आरक्षण रद्द करावं, अशी मागणी उचलून धरली जात आहे. माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील सोडत निकष समितीच्या अहवालातही हे आरक्षण रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र ही शिफारस आणि सर्वसामान्यांची मागणी म्हाडाकडून अद्यापही विचारातच घेतली जात नसल्याने या वर्गातील काही घरांना शून्य प्रतिसाद मिळत आहे.

म्हाडा कर्मचारी, संरक्षण दल, स्वातंत्र्य सैनिक अशा काही गटातील घरांनाही शून्य प्रतिसाद मिळाला आहे. या  वर्गाने महागडी अर्थात उच्च गटातील घरे नाकारल्याचेही यानिमित्ताने समोर आलं आहे.


'या' घरांचे काय होणार?

एकूण १६ घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने या घरांसाठी १० नोव्हेंबरला लाॅटरी काढली जाणार नाही. त्यामुळे पुढे या घरांचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जेव्हा घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा सर्वसाधारण गटातील प्रतिक्षा यादीवरील विजेत्यांना ही घरे वितरीत केली जातील.


अशी आहेत ही १६ घरे

संकेत क्रमांक
ठिकाण
उत्पन्न गट
आरक्षित गट
घरे
अर्ज
  शून्य प्रतिसाद
३३७
कन्नमवार, विक्रोळी
अल्प
लोकप्रतिनिधी



३३९
सिद्धार्थनगर, गोरेगाव
 मध्यम
लोकप्रतिनिधी



३४२
गेस्ट हाऊस, उन्नतनगर
मध्यम
लोकप्रतिनिधी



३४४  
चारकोप, कांदिवली
अल्प
 लोकप्रतिनिधी



३४६
चारकोप, कांदिवली
अल्प
लोकप्रतिनिधी



२६७-सी  
शिंपोली, बोरिवली
अल्प
 संरक्षण दल



३३८
तुंगा, पवई
उच्च
 संरक्षण दल    



३४७  
चारकोप, कांदिवली
उच्च
संरक्षण दल



३३५
लोअर परळ  
 उच्च
संरक्षण दल



२६७ सी
शिंपोली, बोरिवली
 उच्च
स्वातंत्र्य सैनिक



३३८
 तुंगा, पवई  
उच्च
अंध-शारिरीकदृष्ट्या अपंग



३४७
चारकोप, कांदिवली
  उच्च
स्वातंत्र्य सैनिक



३४८  
 चारकोप, कांदिवली
उच्च
स्वातंत्र्य सैनिक



३३८
तुंगा, पवई
 उच्च
म्हाडा कर्मचारी


          


हेही वाचा-

भाजीवाले, फेरिवाले, रिक्षावाल्यांची घरे कागदावरच

अभिनंदन, तुम्हाला लाॅटरीआधीच म्हाडाचं घर लागलं!

'अभिनय' बेर्डेला हवंय म्हाडाचं घर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा