Advertisement

एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत, कधी आणि कसा भराल अर्ज?

बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या म्हाडाच्या सोडतीसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत, कधी आणि कसा भराल अर्ज?
SHARES

म्हाडाकडून आता पुन्हा एकदा स्वत:चं घर आणि तेही मुंबईत असावं अशी इच्छा मनी बाळगणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. (Mhada to issue Lottery in april end know income group and registration details latest updates)

बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या म्हाडाच्या सोडतीसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हाडाकडून 3820 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. सर्व उत्पन्न गटांसाठी ही सोडत असेल, जिथं घरांच्या किमती 32 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे.

एप्रिल महिन्याअखेर निघणाऱ्या म्हाडाच्या सोडतीसाठी कोणत्या गटासाठी किती घरं?

गट घरं
अत्यल्प गट
2611 घरं
अल्प गट
1007 घरं
मध्यम गट
85 घरं
उच्च गट
116 घरं


दरम्यान, एप्रिलचा अखेरचा आठवडा ते मे महिन्याचा पहिला आठवडा या कालवधीत घरांची सोडत निघणार आहे. ज्यानंतर पुढील 45 दिवसांच्या कालावधीत अर्जासाठीची नोंदणी, अर्जविक्री आणि पुढील प्रक्रिया अंमलात आणली जाईल. सोडतीचा निकाल लागण्यासाठी जून - जुलै उजाडण्याची चिन्हं आहेत.

म्हाडाच्या या सोडतीमध्ये सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार सर्वात महागड्या घराची किंमत तब्बल 4 कोटींपेक्षाही जास्त आहे. अंधेरीतील जुहू विक्रांत येथे असणाऱ्या या घरासाठी 4 कोटी 38 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर, गोरेगावच्या पहाडी भागात असणाऱ्या घरांच्या किमती कमी असल्याचं कळत आहे.

कोणत्या भागात उपलब्ध असतील घरं?

कन्नमवार नगर, चारकोप सेक्टर 5, जुनं मागाठाणे बोरिवली, पत्राचाळ गोरेगाव, गायकवाड नगर मालाड, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रांत सोसायटी विक्रोळी, एम्बसी सोसायटी, गव्हाणपाडा मुलूंड, पीएमजीपी मानखुर्द, मनहास सोसायटी, उन्नत नगर, थ्री स्टार सोसायटी, जुहू विक्रांत, निर्यानंद नगर, ट्युलिप सोसायटी अंधेरी, उदय भवन शेल कॉलनी चेंबूर, टिळक नगर चेंबूर, चांदीवली पवई, सिटी व्ह्यू लोअर परळ, हेरिटेज अपार्टमेंट सायन, प्रतीक्षा नगर, शिंपोली, तुंगा पवई या भागांमध्ये म्हाडाच्या आगामी सोडतीतील घरं विभागणीनुसार उलब्ध करून देण्यात येतील.



हेही वाचा

म्हाडा कोकण मंडळ सोडत: अर्जविक्री-स्वीकृतीला १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

म्हाडाच्या लॉटरीसाठी सरकारने नियमात केला 'हा' बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा