Advertisement

Mumbai Mhada Lottery : 4 हजार 83 सदनिकांसाठी 'इतके' अर्ज अपात्र

अर्ज अपात्र ठरला असेल तर चिंता नको. अजून एक संधी आहे. 19 जुलै या वेळेत अर्जदारांकडे आणखी एक संधी आहे.

Mumbai Mhada Lottery : 4 हजार 83 सदनिकांसाठी 'इतके' अर्ज अपात्र
SHARES

मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता म्हाडाकडून अर्ज केलेल्या पात्र आणि अपात्रांची प्रारूप (Mumbai MHADA Lottery Draw 2023) यादीही जाहीर केली आहे. 

म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे. या यादीनुसार 527 अर्जदारांचा अर्ज अपात्र ठरले आहेत. 

जर तुमचं नाव अपात्र यादीत असेल तर अजूनही संधी गेलेली नाही. म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करुन 'My lssue' या मेूनमध्ये जाऊन 'Raise Grievance' हा पर्याय वापरुन हरकती दावे तुम्हाला ऑनलाइन नोंदविता येणार आहे. यासाठी म्हाडाने अर्जदारांना उद्या म्हणजे 19 जुलै 2023 दुपारी 3.00 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. 

मुंबईतील 4082 घरांच्या विक्रीच्या ऑनलाइन लॉटरीला उदंड प्रतिसाद दिसून आला आहे. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन यापरिसरासाठी ही लॉटरी आहे. या घरांसाठी 1 लाख 45 हजार 849 ऑनलाइन अर्ज मिळाले आहेत. या प्रक्रियेतील अंतिम यादी 24 जुलैला दुपारी 3 वाजता housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 



हेही वाचा

... तर 45 मिनिटांचे अंतर 7 मिनिटांत गाठणे शक्य, मुंबईकरांचा प्रवास जलद होणार

दहिसर ते भाईंदर ५० मिनिटांचा प्रवास आता 15 ते 20 मिनिटांत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा