Advertisement

कोस्टल रोडसाठी ६०० झाडांचा बळी

कोस्टल रोड (Coastal road - सागरी किनारा महामार्ग) हा मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या कोस्टल रोडसाठी आता ६०० झाडांचा (tree) बळी जाणार आहे.

कोस्टल रोडसाठी ६०० झाडांचा बळी
SHARES

कोस्टल रोड (Coastal road - सागरी किनारा महामार्ग) हा मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या कोस्टल रोडसाठी आता ६०० झाडांचा (tree) बळी जाणार आहे. या ६०० झाडांपैकी १४० झाडं कापली जाणार आहेत. तर ४६० झाडांचं पुनर्रोपन करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर २८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 

 मेट्रोच्या कारशेडसाठी (Metro Carshed) आरे काॅलनीतील (aarey Colony) झाडं तोडल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. झाडं तोडण्याविरोधात त्यावेळी शिवसेनेने (shiv sena) आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेची मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) सत्ता आहे. त्यामुळे कोस्टल रोडसाठी  (Coastal road) झाडं तोडण्यावर शिवसेना काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यानची ६०० झाडे (tree) आता हटवावी लागणार आहेत. भुलाबाई देसाई मार्गावर पालिकेने तशा नोटिसाही लावल्या आहेत.

पालिकेच्या उद्यान विभागाने झाडं तोडण्याबाबतची नोटीस १७ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली आहे.  नागरिकांचे आक्षेप किंवा सूचना सात दिवसात जिजामाता उद्यानातील उद्यान अधीक्षक यांच्या कार्यालयात लेखी देण्याबाबतही या नोटीसीत सांगण्यात आलं आहे. २८ फेब्रुवारीला उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. मात्र, या सुनावणीसाठी केवळ अर्धा तास देण्यात आला आहे. ६०० झाडे  (tree) विस्थापित अथवा नामशेष होणार असताना त्याबद्दलच्या सुनावणीसाठी केवळ अर्धा तास देण्यात आल्याबद्दल पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे.

या ठिकाणची झाडं तोडणार

  • प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शिनी पार्क येथील ३१ झाडे कापणार. १२७ झाडांचे पुनर्रोपन 
  • भुलाबाई देसाई मार्ग ते टाटा गार्डन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ६१ झाडांची कापणी. ७९ झाडांचे पुनर्रोपन 
  •  हाजी अली ते लोटस जंक्शन येथील ३८ झाडे तोडणार. ४९ झाडांचे पुनर्रोपन. वरळीतील १० झाडे तोडणार. २०५ झाडांचे पुनर्रोपन 



हेही वाचा -

वर्सोवा-विरार सागरी सेतूला एमएसआरडीसीची मान्यता

'इतक्या' एसी लोकलची बांधणी लांबणीवर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा