Advertisement

ऑटिझम आणि दिव्यांग मुलांसाठी मुंबईत उभारले पहिले पार्क

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत बांधण्यात आले आहे.

ऑटिझम आणि दिव्यांग मुलांसाठी मुंबईत उभारले पहिले पार्क
SHARES

पश्चिम उपनगर वांद्रे इथे जॉगर्स पार्कजवळ एका नवीन उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे जे ऑटिझम स्पेक्ट्रमवरील मुलांसाठी आणि विशेष दिव्यांग मुलांसाठी डिझाइन केलेले आहे. हा पार्क आय लव्ह मुंबई फाऊंडेशनचा एक उपक्रम आहे

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत बांधण्यात आले आहे.

इंडियन एक्स्प्रेसला आय लव्ह मुंबई फाऊंडेशनचे प्रमुख राहुल कनाल यांनी माहिती दिली आहे की, केवळ दिव्यांगांठी विकसित केलेल्या या पार्कमध्ये स्विंग, स्लोप आणि हँड बॉल अशा 32 वेगवेगळ्या प्रकारच्या राइड्स आहेत. विशेषत: दिव्यांगांसाठी डिझाइन केलेले आहे.

खेळाच्या क्षेत्रामध्ये विंड चाइम्स आणि बास्केट बॉलसह आर्क बॉल सारख्या खेळाच्या वस्तू देखील आहेत ज्याचा उद्देश मुलांची कौशल्ये वाढवणे आहे.

पार्कमध्ये रबर पॅडेड फ्लोअरिंग आणि खेळण्याची उपकरणे देखील आहेत जी व्हील-चेअर अनुकूल आहेत. राहुल कनालला IE द्वारे उद्धृत केले होते की, हे पहिले उद्यान आहे जे केवळ विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी डिझाइन केलेले आहे.

वांद्रे येथील रहिवासी आणि ऑटिझम स्पेक्ट्रमवरील एका मुलाच्या आईने मिड डे ला माहिती दिली की, पार्कमध्ये तिच्या मुलाला बरे वाटते. तो शांत होतो.

फ्रँक सोरेस, पालिका-नियुक्त काळजीवाहू आणि जॉगर्स पार्कचे प्रभारी म्हणाले की, हे उद्यान शहरातील विशेष शाळांमधील मुलांना एकत्र खेळण्याची संधी देखील देतं.

सोरेस पुढे म्हणाले की काही संस्थांनी आधीच विद्यार्थ्यांना उद्यानात आणले आहे आणि रविवारी येथे सर्वाधिक गर्दी असते. ते म्हणाले की हा विभाग हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे.हेही वाचा

Shraddha Murder Case: लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी

महालक्ष्मी रेल्वे ओव्हर ब्रिजचा विस्तार एस ब्रिज जंक्शनपर्यंत होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा