Advertisement

पुढच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता

साध्यस्थितीत पावसानं विश्रांती घेतली असून, लवकरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.

पुढच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता
SHARES

मुंबईत ऑगस्ट महिन्यात पावसानं तुफान बॅटिंग केली. साध्यस्थितीत पावसानं विश्रांती घेतली असून, लवकरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याशिवाय, या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, कोकणातही मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून, १७ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याचा अंदाज आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण उत्तर भारत, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशमधून परतणार असल्याची शक्यता आहे.

सध्या तरी मुंबईत पावसाचा जोर कमी आहे. सांताक्रूझ वेधशाळेत ०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर व पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात सर्वाधिक म्हणजे २.०७ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझड सुरूच आहे. ७ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ३ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा