Advertisement

समृद्धी महामार्ग: ऑक्टोबरला काम सुरू, 2020 ला मुंबई-नागपूर 8 तासांत


समृद्धी महामार्ग: ऑक्टोबरला काम सुरू, 2020 ला मुंबई-नागपूर 8 तासांत
SHARES

मुंबई-नागपूर सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्ग जमीन संपादनामुळे वादात अडकला असला तरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाच्या कामाला वेग दिला आहे.

समृद्धीसाठी तीन महिन्यांत निविदाप्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा मानस असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी `मुंबई लाइव्ह`ला दिली. तसेच, काम सुरू झाल्यापासून अडीच ते तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



हे देखील वाचा - 

समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी 33 कंपन्यांची तयारी




या प्रकल्पासाठी 700 किमीपैकी अंदाजे 650 किमी मार्गावरील जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दर्शवली असून काहींचा विरोध आहे. तो दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करत ऑक्टोबरमध्ये कामाला सुरुवात करून दुसऱ्या बाजूने जमीन संपादनाची प्रक्रियाही सरू राहील.

- राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी



हे देखील वाचा - 

'झोपु' सुकर करणार 'समृद्धी'चा आर्थिक मार्ग!



काम कोण करणार हे कसे ठरणार?

मुंबई ते नागपूर हे अंतर कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी 16 पॅकेजेसमध्ये मार्च 2017 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदेला 33 कंपन्यांनी प्रतिसाद दिला. तर प्रत्यक्षात 27 कंपन्यांनी निविदा सादर केल्या. त्यानुसार या 27 पैकी 3 कंपन्या पात्र ठरल्या असून 7 कंपन्यांच्या निविदेमध्ये काही शंका असल्याने त्यांनाही पात्र ठरवत निविदेत आवश्यक त्या सुधारणा करत निविदा सादर करण्यासाठी 29 जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

त्याचवेळी, 16 पॅकेजमध्ये काम करावयाचे असल्याने 16 पॅकेजसाठीही निविदा सादर व्हाव्यात आणि स्पर्धा वाढावी यादृष्टीने निविदेत बदल करत पुन्हा निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात किती निविदा येतात आणि त्यातून कोण बाजी मारते हे तीन महिन्यानंतर निविदा अंतिम होतील, त्यावेळीच स्पष्ट होईल, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे.


असा आहे समृद्धी महामार्ग

  • मुंबई-पुणे सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्ग
  • सुमारे 710 किमी लांबीचा महामार्ग
  • खर्च अंदाजे 46 हजार कोटी
  • या महामार्गामुळे मुंबई ते नागुपर हे अंतर 16 तासांएवजी आठ तासांत होणार पूर्ण
  • 10 जिल्हे, 30 तालुके आणि 354 गावांतून जाणार महामार्ग
  • सुमारे 20 हजार 820 हेक्टर जमीन करावी लागणार संपादीत
  • नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यातून जाणार महामार्ग
  • 16 पॅकेजसमध्ये होणार काम
  • ऑक्टोबर 2017 ला काम सुरू करून 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस
  • या मार्गासाठी मोजावा लागणार भरमसाठ टोल



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा