Advertisement

समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी ३३ कंपन्यांची तयारी


समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी ३३ कंपन्यांची तयारी
SHARES

मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस-वे अर्थात, समृद्धी महामार्गाच्या बांधणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)च्या निविदा प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. चार-पाच नव्हे तर तब्बल 33 कंपन्यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधणीसाठी उत्सुकता दाखवली आहे. यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांचा सहभाग असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरूंदकर यांनी दिली आहे.

706 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी जानेवारीमध्ये एमएसआरडीसीने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार निविदा सादर करण्याची मुदत नुकतीच संपल्याने एमएसआरडीसीने निविदा खुल्या केल्या आहेत. त्याप्रमाणे 33 कंपन्यांनी निविदा सादर करत या प्रकल्पाच्या बांधकामासाठी उत्सुकता दाखवली आहे. यात चीन-रशियासह अन्य देशातील बारा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. उर्वरित 21 कंपन्या या राष्ट्रीय स्तरावरील पण पायाभूत सुविधा विकास प्रकल्पातील नामांकित कंपन्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर निविदेला प्रतिसाद मिळाल्याने आता यातून एका कंपनीची निवड करत समृद्धीचे कंत्राट देण्याचे मोठे आव्हान एमएसआरडीसीसमोर उभे ठाकणार आहे. आता या निविदांचा अभ्यास करत लवकरच यातून एका कंपनीची निवड करण्यात येईल, असेही कुरूंदकर यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा - 

मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वेच्या मोजणीला सुरुवात


निविदा सादर केलेल्या काही कंपन्या

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी, लार्सन अॅण्ड टुर्बो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, गॅमन इंडिया, अशोका बिल्डकॉन, गायत्री प्रोजेक्ट्स, पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, कृष्णमोहन कन्स्ट्रक्शन, ओरियएन्टल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, नवयुग ग्रुप, दिलीप बिल्डकॉन लि., एसईडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर, चायना कन्स्ट्रक्शन फिफ्थ इंजिनियरिंग डिव्हिजन कॉर्पोरेशन लि,. सीजीसीडी कन्स्ट्रक्शन इत्यादी.


हेही वाचा -

'झोपु' सुकर करणार 'समृद्धी'चा आर्थिक मार्ग!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा