Advertisement

शिवडी-न्हावा पूल प्रकल्प ९५ टक्के काम पूर्ण

जपानी संस्थेने त्यासाठी ८५ टक्के अर्थपुरवठा केला आहे.

शिवडी-न्हावा पूल प्रकल्प ९५ टक्के काम पूर्ण
SHARES

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात मुंबई- न्हावा पारबंदर पूल प्रकल्पाचे ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील दहा दिवसांत डेक टाकण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे संपूर्ण काम येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल, असा विश्वास एमएमआरडीएचे मेट्रोपोलिटन आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला आहे.

श्रीनिवास यांनी सांगितले की, या पुलाची एकूण लांबी २२ किलोमीटर असून यात दोन्ही बाजूला ५.५ किलोमीटर जोडरस्ता असणार आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेने दिलेल्या कर्जाच्या सहाय्याने हा प्रकल्प राबवला जात आहे. याचा सुधारित खर्च १७,८४३ कोटी रुपये इतका आहे.

जपानी संस्थेने त्यासाठी ८५ टक्के अर्थपुरवठा केला आहे. या पुलाच्या १६.५ किमी पैकी केवळ १८० मीटरचे डेक टाकण्याचे काम बाकी आहे. हे काम २६ मे पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता मेट्रोपोलिटन आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केली आहे.

पुलाची दोन टोकांकडूनचे बांधकाम जोडून सलग पूल तयार होतो, तेव्हा त्याला शेकहँड म्हटले जाते.आता शेकहँड कामासाठी फक्त १८० मीटरचे डेक टाकण्याचे काम बाकी आहे. या प्रकल्पाच्या पायाभरणी कामाचा शुभारंभ डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आला होता.

सध्या या प्रकल्पाचे डांबरीकरण, टोलनाका उभारणी, सुरक्षा आणि नियंत्रण कक्षाचे बांधकाम आणि इतर काही कामे शिल्लक आहेत. ती लवकरच पूर्ण केली जातील.हेही वाचा

कोस्टल रोड लगत सागरी संरक्षक भिंतीची उभारणी

लगून रोड ते इन्फिनिटी मॉल पर्यंतच्या पुलाला मंजूरी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा