'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' पेक्षाही मोठा असेल 'मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे'


SHARE

तब्बल २० हजार कोटी रुपये खर्चून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा मुंबई-द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार आहे. येत्या ३ महिन्यांत भू संपादन व आवश्यक कामे सुरु होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

वर्सोवा खाडीवर नवीन चौपदरी पूल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील इतर ७ रस्ते प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत असल्याने मुंबई महानगर क्षेत्र आगामी काळात देशातील महत्वाचं ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.वर्सोवा खाडी पूल वेळेत पूर्ण करणार

प्रस्तावित वर्सोवा नवा खाडी पूल १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पोलीस व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी २४७ कोटी खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून सीआरझेड आणि इतर आवशयक परवानग्या मिळाल्यानंतर पुलाची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.


जलवाहतुकीला प्राधान्य

२२ किमीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ४ वर्षांत पूर्ण करणार असून हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असणार आहे. पुढील काळात जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्याच्या वांद्रे वरळी सागरी सेतू वर्सोवापर्यंत तसेच पुढे वसई-विरारपर्यंत कसा जाईल आणि याभागातील नागरिकांना देखील दर्जेदार आणि अद्ययावत वाहतूक सुविधा मिळेल, याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलं.हेही वाचा-

म्हणून नौदलावर भडकले गडकरी!


संबंधित विषय