Advertisement

नालासोपाऱ्यात इमारत कोसळली, जीवितहानी नाही

नालासोपाऱ्यात मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ११ वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली. सुदैवाने रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.

नालासोपाऱ्यात इमारत कोसळली, जीवितहानी नाही
SHARES

नालासोपाऱ्यात मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ११ वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली. सुदैवाने रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच वसई, विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात ‘साफल्य’ ही चारमजली अनधिकृत इमारत २००९ मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये २० फ्लॅट होते. इमारत धोकादायक झाल्याने राहिवाशांना महापालिकेने बाहेर पडण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे १५ कुटुंबांनी इमारत सोडली होती. ५ कुटुंब मात्र इमारतीत राहत होती. 

इमारतीच्या काही भिंतींची माती मंगळवारी रात्री १० वाजल्यापासूनच पडत होती. त्यामुळे  रात्री १२ च्या सुमारास सर्व रहिवासी इमारतीच्या खाली आले. मध्यरात्री एक वाजता इमारत कोसळली.

इमारतीच्या पहिल्या ते चौथ्या मजल्यावर एकूण पाच कुटुंबांचे वास्तव्य होते. चौथ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ४०१ मध्ये देवरुखकर कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात चार जण आहेत. इमारत कोसळण्याच्या ५ ते १० मिनिट आधी ते चौथ्या मजल्यावरील घरात पैसे आणण्यासाठी गेले होते. पैसे घेऊन इमारतीच्या गेटबाहेर पडत नाहीत, तोच त्यांच्या पाठीमागे इमारत कोसळली असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा -

आरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा