पूर्व मुक्त मार्गावर दोन अद्ययावत चौक्या

 Pali Hill

See all

मुंबई - सीएसटी ते माहुल जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गावर वडाळा आणि रे रोड येथे दोन अद्ययावत पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. त्याचं उदघाटन 25 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. पूर्व मुक्त मार्ग हा दुतर्फा असून 13 किलो मीटर लांब अंतराचा आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना हा मार्ग हाताळणं अवघड जात होते. मात्र वडाळा व रे रोड या मार्गाच्या दोन्ही टोकांना उभारण्यात आलेल्या चौक्यांमुळे हा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे, असं मत पडसळगीकर यांनी व्यक्त केलं. या वेळी सह पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे, आदी मान्यवर, पोलीस पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कशी आहे अद्ययावत चौकी -

अद्ययावत असलेल्या या चौक्यांतून एखादा अपघात झाला अथवा वाहन बंद पडलं, तर तात्काळ मदत मिळेल. चौकीजवळ अनेक यंत्रणांनी सुसज्ज अशी दोन दुचाकी वाहनं आणि टोईंग व्हॅनही असेल. त्याच बरोबर या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.

Loading Comments