Advertisement

मानखुर्द ते वाशी दरम्यानचा नवीन फूट ओव्हर ब्रिज सर्व सामान्यांसाठी खुला

शुक्रवारी या ब्रिजचे उद्घाटन झाले आहे.

मानखुर्द ते वाशी दरम्यानचा नवीन फूट ओव्हर ब्रिज सर्व सामान्यांसाठी खुला
SHARES

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) ने शुक्रवारी हार्बर मार्गावर मानखुर्द आणि वाशी दरम्यान नवीन फूट ओव्हर ब्रिज (FOB) खुला केला आहे. 4 मीटर रुंद संरचना, ट्रेसपास नियंत्रण योजनेंतर्गत बांधण्यात आली आहे, ती 20 मीटर लांबीची आहे, जो पादचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा ब्रिज आहे. 

एफओबीचे बांधकाम एप्रिल 2023 मध्ये सुरू झाले आणि अनेक महिन्यांच्या समर्पित प्रयत्नांनंतर शुक्रवारी त्याचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले. MRVC च्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाची एकूण किंमत 2 कोटी आहे, याची पुष्टी MRVC चे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) सुनील उदासी यांनी केली आहे.

MRVC च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "FOB ची 4 मीटर रुंदी प्रवाशांसाठी पुरेशी जागा देते, ज्यामुळे पादचारी वाहतूक सुरळीत होते. प्रत्येक 3 मीटर रुंद अशा दोन पायऱ्यांचा समावेश आहे," असे MRVC च्या अधिकाऱ्याने सांगितले.हेही वाचा

सायन ब्रिज तोडण्याचे काम 29 फेब्रुवारीपासून सुरू होणार

पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी वरळीत अत्याधुनिक रोबो अँड शटल पार्किंग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा