Advertisement

'प्रगती का हाय वे'; राज्यात रस्तेबांधणीसाठी २,७८० कोटींचा निधी मंजूर

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘प्रगती का हाय वे’ हॅश टॅग अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रस्ते बांधणीच्या कामांची माहिती ट्विटरवरून दिली.

'प्रगती का हाय वे'; राज्यात रस्तेबांधणीसाठी २,७८० कोटींचा निधी मंजूर
SHARES

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘प्रगती का हाय वे’ हॅश टॅग अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रस्ते बांधणीच्या कामांची माहिती ट्विटरवरून दिली. कुठल्या रस्त्यांवर पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणाची कामे होणार आणि त्यासाठी किती रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, यासंबंधीची माहिती देखील गडकरी यांनी दिली आहे. 

राज्यात रस्तेबांधणीसाठी तब्बल २ हजार ७८० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रस्ते, पूल आणि महामार्गांचे नूतनीकरण केलं जाईल.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग ७५३ जे वरील जळगाव-भद्रावन-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड रोड दरम्यान रस्ते विस्तारीकरणासाठी तसंच हा मार्ग दुपदरी/चौपदरी करण्यासाठी २५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग १६६ ई वरील गुहार-चिपळूणला जोडणाऱ्या रस्त्याचं काम करण्यासाठी १७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी वरील २६२ किमी ते ३२१ किमीच्या अंतरामध्ये १६ लहान-मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ७५२ आय वरील वतूर ते चारठाणा दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी तसंच पुनर्वसनासाठी २२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील तिरोरा ते गोंदियादरम्यान दुपदरी रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी सोबतच हे काम करण्यासाठी २८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग १६६ जी वरील तारीरी-गगनबावडा-कोल्हापूर रस्त्याच्या कामासाठी १६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी २८८.१३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ७५३ अंतर्गत येणाऱ्या २८.२ किमीच्या नव्या रस्त्याचं बांधकामही करण्यात येईल. 

नागपूरमधील आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसंच राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन इथं चौपदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एखूण ४७८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६३ वरील मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी १८८ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  

आमगाव गोंदियादरम्यान राष्ट्रीय महामार्ग ५४३ वरील रस्त्याच्या कामासाठी २३९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ वरील परळी गंगाखेडदरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी २२२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


हेही वाचा-

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी निलंबित

एफआयआर कुठंय? परमबीर सिंह यांना हायकोर्टाने फटकारलं


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा