Advertisement

‘झाडं न तोडता मेट्रो म्हणजे केवळ कल्पनाविलास’


SHARES

मुंबई -  झाडांच्या कत्तलीवरून मेट्रो-3 ला वादाचे ग्रहण लागलंय. त्यातच न्यायालयानं झाडांच्या कत्तलीला अंतरिम स्थगिती दिल्यानं हे ग्रहण आणखी गडद झालंय. तर यापुढे जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालत झाडांची कत्तल न करता प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीन प्रयत्न करण्याचे आदेश एमएमआरसीला दिले आहेत. सगळीकडूनच कोंडी झाली असतानाही एमएमआरसी मात्र झाडांची कत्तल न करता प्रकल्प राबविताच येणार नसल्यावर आजही ठाम आहे. एक तर झाडं वा मेट्रो असं म्हणत एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी झाडं न तोडता मेट्रो राबवा असं म्हणणं म्हणजे केवळ कल्पनाविलास असल्याचं म्हणत प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना टोला मारला आहे.

झाडांच्या कत्तलीबाबत, झाडांच्या पुनर्रोपनाबाबत याचिकाकर्त्यांकडून होत असलेली ओरड चुकीची असल्याचंही भिडे यांंनी म्हटलंय. तर प्रकल्पातील पर्यावरणासंबंधीचं वास्तव आणि मेट्रो-3 चे मुंबई नी मुंबईकरांच्यादृष्टीनं असलेलं महत्त्व न्यायालयासमोर मांडत प्रकल्पातील अडचणी दूर करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

4255 झाडं याआधी प्रकल्पात बाधित होणार होती तिथे आता केवळ 2800 झाडच बाधित होणार आहेत. 2800 मधील केवळ 1090 झाडं कापली जाणार असून, उर्वरित झाडांचे पुनर्रोपन करण्यात येणार आहे. इतकचं नव्हे तर 25,000 रोपटेही मेट्रो परिसरात लावली जाणार असल्याचं म्हणत भिडे यांनी पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास या प्रकल्पामुळं होणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. गेल्या कित्येक महिन्यांपासून झाडांचा, आरेचा वाद जोरात सुरू असताना आतापर्यंत मौन धारण केलेल्या एमएमआरसीला अखेर समोर येत आपली बाजू मांडावी लागली आहे. त्यामुळे आता ही बाजू मेट्रो-3 ला तारते का? हे येणारा काळच ठरवेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा