पैशाची उधळपट्टी?

 Goregaon
पैशाची उधळपट्टी?
पैशाची उधळपट्टी?
पैशाची उधळपट्टी?
पैशाची उधळपट्टी?
See all

गोरेगाव - गोरेगावमध्ये पालिकेने एका उद्यानात 2 शौचालय बांधण्याची परवानगी दिली आहे. गोरेगाव पू्र्व पांडुरंगवाडी आणि गोरेगाव मुलूंड लिंक रोडला जोडून ब्रम्हचारी विश्वनाथ गुरुजी उद्यान आहे. हे शौचालय नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणार आहे. मात्र पालिकेकडून एकाच मैदानात 2 शौचालय बांधण्याची गरज नसल्याची प्रतिक्रीया स्थानिकांनी दिली आहे. जिथे गरज आहे तिथे शौचालयाची मागणीही यावेळी स्थानिकांनी केली आहे. तसंच उद्यानात जुने शौचालय सर्व सामान्यांसाठी खुले करुन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सचिव सचिन चव्हाण आणि वॉर्ड अध्यक्ष सलिम पटेल यांनी पालिकेकडे केली आहे.

Loading Comments