Advertisement

कुलाबा ते सीप्झ भुयारीकरणाच्या ९ टप्प्यांचे काम अद्याप शिल्लक

कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिकेच्या भुयारीकरणाचे केवळ ९ टप्पे बाकी आहेत.

कुलाबा ते सीप्झ भुयारीकरणाच्या ९ टप्प्यांचे काम अद्याप शिल्लक
SHARES

कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिकेच्या भुयारीकरणाचे केवळ ९ टप्पे बाकी आहेत. आत्तापर्यंत ५४.५ किमीपैकी ४८ किमी भुयारीकरण पूर्ण झाले. मेट्रो ३च्या भुयारीकरणाचा पहिला टप्पा २४ सप्टेंबर २०१८ ला पूर्ण झाला होता. त्यानंतर सोमवारी ५ ऑक्टोबरला ३२ वा टप्पा पूर्ण झाला.

मेट्रो ३ मार्गिकेवर एकूण १७ टनेल बोअरिंग मशिनच्या (टीबीएम) साहाय्याने हे भुयारीकरण केले जाते. त्यासाठी ७ ठिकाणी मोठी विवरे (लाँचिंग शाफ्ट) तयार करण्यात आले आहेत. मेट्रो ३ पूर्ण झालेले भुयारीकरण हे पॅकेज २,५ आणि ७ अंतर्गत झाले आहे. तर पॅकेज एक, तीन, चार आणि सहामधील भुयारीकरणाचे ९ टप्पे अद्याप बाकी आहेत.

मेट्रो—३ मार्ग हा मुंबईतील अत्यंत दाटीवाटीची वस्ती, जुन्या इमारती, ऐतिहासिक वारसा तसेच उत्तुंग इमारती, उड्डाणपूल, मेट्रो मार्ग व रेल्वे मार्गाखालून जात असल्याने येथील भुयारीकरणाचे काम हे आव्हानात्मक आहे.



हेही वाचा -

प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा